strike of ST from Monday due to demand for merger adv jayshri patil mumbai Sakal
मुंबई

Mumbai : विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटीत सोमवारपासून काम बंदची हाक

ॲड.जयश्री पाटील यांनी महामंडळाला दिली नोटीस; प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षी केलेल्या संपातील अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कष्टकरी जनसंघाने पुन्हा एकदा ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात कामबंद आंदोलनाची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष ॲड.जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिली आहे.

ज्यामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये सेवा सलगता नियमित करणे व खाते अंतर्गत होणाऱ्या परीक्षेसाठी २४० दिवसांची अट ताबडतोब रदद करण्यात यावी अशीही मागणी केली आहे. तत्कालीन परिस्थितीत ज्या सनदी अधिकाऱ्यांनी समिती गठीत करुन विलनीकरणाचा अहवाल सादर केला होता तो अहवाल रदद करावा,

तेलंगाना राज्य सरकारच्या धर्तीवर एसटीचे शासनात विलनीकरण करावे, शासनानातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना थकबाकीसह मिळावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, शिस्त व आवेदन पध्दत ताबडतोब रदद करावी,

इलेक्ट्रीक बसच्या करारामध्ये खासगी चालक वापरण्याचे कंत्राट ताबडतोब रदद करावे, दिवाळी करिता एक पगार बोनस द्यावा, सेवानिवृत्त कर्मचान्यांना ३५०० ऐवजी कमीतकमी १८ हजार पेन्शन द्यावी यासह अनेक मागण्या कष्टकरी जनसंघाचे केल्या आहे.

सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर आंदोलनं करत आहे ही राजकीय खेळी आहे. सबंध मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान फडणवीसांच्या विरोधात जे वातावरण तयार झालं तो फडणवीसांचा माणूस, बोलका बाहुला असं वातावरण तयार झाला. त्यामुळे मी फडणवीस यांचा नाही असा भाबडा प्रयत्न सदावर्ते करत आहे.परंतु लोक अशा भ्रामक कल्पकतेला फसणार नाही.

- सुषमा अंधारे, उबाठा, नेत्या

साडे पाच महिन्यांच्या प्रदीर्घ संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लिखित स्वरूपात लागू झाला म्हणून आझाद मैदानात गुलाल उधळत जल्लोष केला. आता मात्र, पुन्हा सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाची नोटीस देणे ही एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल नाही का ? सदावर्ते वकील दाम्पत्य एसटी कर्मचाऱ्यांसोबत पुन्हा लबाडी करत आहे.

- श्रीरंग बरगे ,सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT