संगीता जाधव  sakal
मुंबई

एका शिक्षेकेची शिक्षणासाठी धडपड; समस्येतून शैक्षणिक गुणवत्तेकडे

कोरोना चे नियम पाळून व शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुलांना शैक्षणिक धडे देण्याचे काम या शिक्षिका करत आहेत

संदीप पंडित

विरार : कोरोनाच्या पार्श्वभूमीत गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद. त्यामुळे बर्‍याच कुटुंबाची वाताहत झाली आहे. आर्थिक चणचण, दारिद्र्य यामुळे जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडे साधनसामग्रीचा अभाव असल्याने शालेय शिक्षणात व्यत्यय येत आहे.या सगळ्यावर मात करत ती मुलांना शिकवण्यासाठी धडपड करत आहे. या समस्येतून शैक्षणिक गुणवता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

पालघर जिल्ह्यातील अशीच ग्रामीण भागातील अर्नाळा जवळील मुक्कामपाडा येथील जिल्हा परिषदेची सेमी इंग्रजी शाळा या शाळेत अनेक पाड्यातील मुले शिक्षणासाठी येत आहेत. या मुलांकडे अँड्रॉइड फोनचा अभाव असल्याने आणि मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून येथील शिक्षिका सौ संगीता जाधव यांनी गावातील व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांकडे ही समस्या सांगितली .त्यातील पुरषोत्तम कुडू यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवर जागा उपलब्ध करून दिली. या ठिकाणी कोरोना चे नियम पाळून व शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुलांना शैक्षणिक धडे देण्याचे काम या शिक्षिका करत आहेत.

गेल्या वर्षी तर त्यांनी वाड्या, अंगणात बसून शैक्षणिक धडे मुलांना दिले आहेत. गेल्यावर्षीपासून आता पर्यंत सौ संगीता जाधव यांनी कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांकडून अनेक समस्या जाणून घेतल्या व अनेक कुटुंबांना त्यांनी मदतीचा हात दिला. अनेक दानशूर व्यक्तींकडून मुलांना शैक्षणिक मदत मिळवून दिली आहे.

संगीता जाधव यांना या पूर्वी जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार हि मिळाले आहे. 1 ली ते 4 पर्यंतच्या 18 मुलांना त्या शिक्षण देत आहेत. कोरोना पूर्वी या शाळेची पटसंख्या 40 होती. परंतु कोरोनाच्या काळात येथील काही आदिवासी कुटुंब स्थलांतरित झाल्याने पटसंख्या कमी झाली असली तरी संगीता जाधव मात्र त्याच तन्मयतेने मुलांना शिकवत आहेत. हा शिक्षणाचा ध्यास त्यांना गप्प बून देत नाही. म्हणून त्या पाड्या पाड्यावर जाऊन मुलांना शिक्षणा साठी प्रोत्साहित करण्या बरोबर पालकणांचेही मन वळवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT