मुंबई

परदेशी जाणाऱ्यांच्या लसीकरणाबद्दल झाला मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
  • दुसरा डोस घेण्यासाठी 84 दिवसांची अट होती, पण ती आता शिथिल करण्यात आली आहे.

मुंबई: उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर देण्यात येणार आहे. यामध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक्ससाठी जाणारे स्पर्धक, खेळाडू यांचाही समावेश करण्यात आला असून त्यांनाही 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. दुसरा डोस घेण्यासाठी 84 दिवसाची मर्यादा ठेवण्यात आली होती, मात्र त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रदेशातील शिक्षण आणि त्यांचे प्रवेश अडचणीत येणार असल्याचे समोर आले होते. त्याविषयी मुंबईतील काही खासदार आणि त्यासोबत मुंबई महानगर पालिका प्रशासनाने याबाबत केंद्र सरकारकडे पत्र पाठवून या विद्यार्थ्यांसाठी 84 दिवसाची अट शिथील करावी, अशी मागणी केली होती. (Students and Athletes who wants to go abroad will get second dose after 28 days)

केंद्र सरकारने यासाठी आज सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हा डोस दिला जाईल, त्या विद्यार्थ्यांच्या पासपोर्टसोबत लस घेतल्याचे प्रमाणपत्र लिंक केले जाणार आहे. लस देताना विद्यार्थी परदेशात कोणत्या देशात शिक्षणासाठी जात आहेत ते पाहिलं जाणार आहे. तसेच, त्यांचे तेथील ओळखपत्र, किंवा नोकरीला जाणाऱ्या उमेदवारांचे नियुक्तीपत्र तपासले जाणार आहे. या सर्वांना कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य ती सुविधा उपलब्ध करावी, अशी सुचनाही यामध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर ही योजना 31 ऑगस्टपर्यंत लागू राहील, असेही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT