खड्डे बुजवून विद्यार्थ्यांची शिक्षिकेला श्रद्धांजली
खड्डे बुजवून विद्यार्थ्यांची शिक्षिकेला श्रद्धांजली 
मुंबई

खड्डे बुजवून विद्यार्थ्यांची शिक्षिकेला श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महिनाभरापूर्वी मालाडमधील एस्पी नूतन अकादमी येथील एका शिक्षिकेचे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. अशाच एका दुर्घटनेत परिसरातील दादाराव बिल्होरे यांनी आपला मुलगा गमावला होता. त्यानंतर बिल्होरे यांनी शहरातील रस्त्यांवरील जवळपास ७०० खड्डे स्वत: बुजवले. त्यापासून प्रेरणा घेत एस्पी शाळेच्या विद्यार्थ्यांनीही रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त रस्त्यावरील खड्डे बुजवत आपल्या लाडक्‍या शिक्षिकेला अनोखी श्रद्धांजली वाहिली. या वेळी दादाराव बिल्होरे यांची विशेष उपस्थिती होती. 

दादाराव बिल्होरे यांचे प्रकाश फाऊंडेशन आणि एस्पी नूतन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मालाडमधल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले. या प्रसंगी दादाराव यांनी उपस्थितांना रस्त्यावरील खड्डे बुजवण्यामागील प्रेरणा, यामागील संघर्ष, मूळ हेतू व सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य याबद्दल मार्गदर्शन केले. या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, तसेच शिक्षक विलास पाटील, दीपाली पाटील, उज्ज्वला पाटकर, राजू बांदिवडेकर, संतोष पालांडे, किरण अंकत, नूर काझी, संभाजी पोगले आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT