Growing Concerns Over Breathing Issues and Health Decline esakal
मुंबई

Breathing Disease : ४४ टक्के नागरिकांना ‘ब्रेथलेस’ची बाधा!

Respiratory Distress : श्वासोच्छ्‌वासाच्या त्रासाचा दैनंदिन कामांवर परिणाम ; डॉ. सुजित राजन

सकाळ वृत्तसेवा

Global Public Health : श्वसनाच्या अनेक आजारांबद्दल आणि त्यांच्या दुष्परिणामांबद्दल अनेकदा आपण ऐकत असतो. नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असं स्पष्ट झालाय की देशातील ४४ टक्के लोकसंख्या श्वासोच्छ्‌वासाच्या त्रासाने ग्रस्त आहे. यापैकी चार टक्के गंभीर श्रेणीत आहे.

मुंबईतील पल्मोनोलॉजिस्टने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, श्वासोच्छ्‌वासाचा त्रास होणाऱ्या रुग्णांत वाढ होत असल्याचे ही या अभ्यासात दिसून आले आहे.

पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सुजित राजन यांचा हा अभ्यास नुकताच ‘पीएलओएस ग्लोबल पब्लिक हेल्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार, देशातील सुमारे ६२६ दशलक्ष लोक श्वसनाच्या समस्यांसह जगत आहेत.

त्यापैकी ५२ दशलक्ष लोक गंभीर त्रासाला सामोरे जात आहेत. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, श्वासोच्छ्‌वासाचा त्रासामुळे हा आरोग्याचा स्तर खालावत आहे. ज्यामध्ये दैनंदिन क्रियाकलाप (शारीरिक प्रक्रिया) करण्याची क्षमता कमी होते.

या अभ्यासासाठी डॉ. राजन आणि त्यांच्या टीमने शहरी आणि ग्रामीण भागातील तीन हजार प्रौढांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले. श्वासोच्छ्‌वासाची समस्या अनेक कारणांमुळे उद्‌भवतात. यापैकी २८ टक्के लोकांना खराब पोषणामुळे, १७ टक्के लोकांना यापूर्वीच्या फुप्फुसाच्या व्याधी, १३ टक्के लोकांना अशक्तपणा आढळून आला.

यामध्‍ये ८१ टक्के लोकांनी सांगितले की, श्वासोच्छ्‌वासाच्या त्रासाचा त्यांच्या रोजच्या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. श्वासोच्छ्‌वासाचा त्रास वाढल्याने दैनंदिन कामकाजातही अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : ट्रम्प यांना मोठा झटका! जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला न्यायाधीशांची स्थगिती

Wimbledon Women Final: अव्वल मानांकित सबलेंकाला धक्का; अमेरिकेची अमांडा ॲनिसिमोवा अंतिम फेरीत

Satara Crime: 'दोन महिलांना मारहाण करून लुटले'; मॉर्निंग वॉकसाठी जाताना प्रकार, साडेसात तोळे दागिने लंपास

Breakfast Recipe: वीकेंडच्या नाश्त्यासाठी घरी बनवा चविष्ट चीझ गार्लिक ब्रेड, सोपी आहे रेसिपी

Wimbledon 2025: माजी विजेत्या जोकोविचसमोर सिनरचे आव्हान; विम्बल्डन ग्रँडस्लॅम, अल्काराझ फ्रिट्‌झमध्ये उपांत्य झुंज रंगणार

SCROLL FOR NEXT