अवैध मद्य निर्मिती, तस्करी, विक्री व वाहतूक प्रकरणात नऊ हजार गुन्हे दाखल  esakal
मुंबई

Alcohol Smuggling in Maharashtra : मद्य तस्करांवर करडी नजर

Smugglers Arrest : राज्यात आठ हजारपेक्षा जास्त जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Lok Sabha Election : राज्यात मतदानाचे तीन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले आहेत. या सात आठवड्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, तस्करी, विक्री व वाहतूक प्रकरणात नऊ हजार ३७२ गुन्हे नोंदविले आहे. तर तब्बल आठ हजारपेक्षा जास्त आरोपींना अटक केली. विभागाचे राज्यभरातील भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे.

निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देण्यासाठी उमेदवारांकडून मद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मद्य तस्करीचे हे काम निवडणुकांपूर्वी केले जाते. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करीवर पायबंद घालण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत मद्य तस्करीचे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात येते.

राज्यात १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली होती. १६ मार्च ते ९ मेपर्यंत या तस्करांविरोधात नऊ हजार ३७२ गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये आठ हजार ३१० आरोपींना अटक झाली असून त्यांच्याकडून २८ कोटी ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात मतदानाचे अजून दोन टप्पे शिल्लक आहेत. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे राज्यभरात आणखी मोठ्या राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाई होण्याची शक्यता आहे.

मनुष्यबळाची कमतरता :

1. राज्य शासनाला महसूल मिळून देणारा तिसरा मोठा विभाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बघितले जाते. मात्र, या विभागात गेल्या अनेक वर्षांपासून मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे अवैध मद्य निर्मिती, मद्य तस्करी, विक्री, वाहतुकीविरोधात प्रभावी कारवाई करता येत नाही, ही मोठी अडचण आहे.

2. दुसरीकडे या विभागात पुणे जिल्हात सर्वाधिक मनुष्यबळ आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात सर्वाधिक कारवाईदेखील पुण्यात झाल्याचे सांगण्यात येते. इतर ठिकाणीही हा विभाग मनुष्यबळ व्यवस्थित असते तर कारवाईचा आकडा यापेक्षा जास्त असता, असे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.

मद्य तस्कराविरोधी कारवाई (१६ मार्च ते ९ मे)

  • एकूण गुन्हे - ९,३७२

  • अटक आरोपी - ८,३१०

  • जप्त वाहने - ६२९

  • जप्त मुद्देमालाची किंमत - २८ कोटी ३७ लाख

चेक पोस्ट, भरारी पथके तैणात

राज्य उत्पादन शुल्क विभाग १४० कार्यकारी आणि ४७ विशेष भरारी पथकांद्वारे अवैध मद्य तस्करांविरोधात कारवाई करते. राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये एकूण ४० चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत असून रात्रीच्या गस्तीत ही वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT