sudhagad  sakal
मुंबई

सुधागड किल्ला संरक्षित यादीत ; राज्य सरकारच्या सूचना

पर्यटनवाढीसह रोजगारवृद्धीची अपेक्षा

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

सुधागड : किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे. यामुळे किल्ल्याचे रूपडे बदलणार असून पर्यटनवाढीसह तालुक्यात रोजगारवृद्धीची संधी निर्माण झालेली दिसणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पाचसहा किल्ले निवडले आहेत. यामध्ये कोकणातील सुधागड, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या किल्ल्यांचा त्यात समावेश आहे. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले केंद्राने संरक्षित केले आहेत; मात्र सुधागड किल्ल्याला अजूनपर्यंत असा दर्जा लाभला नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्य पुरातत्त्व संशोधन विभागास सुधागड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या सूचना केल्यानंतर अधिसूचना केली आहे. सुधागड किल्ल्याचा जतन दुरुस्ती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. २१) राज्य पुरातत्त्व संशोधन विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे आणि त्यांच्या पथकाने किल्ला आणि मार्गांची पाहणी केली.

सुधागड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी अधिसूचना काढण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला आहे. प्रथम अधिसूचना निघाल्यानंतर हरकती नसतील तर अंतिम अधिसूचना निघेल. साधारण दोनतीन महिन्यांत किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येईल.

- विलास वाहणे, सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व संशोधन विभाग

असा आहे सुधागड किल्ला

सुधागड किल्ला १६४८ मध्ये नारो मुकुंद यांनी मुघलांकडून जिंकून घेतला. किल्ला शिवरायांच्या स्वराज्यात दाखल झाला. किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून ६२० मिटर आहे. किल्ल्याच्या सखल भागाचे क्षेत्रफळ सुमारे ५५ हेक्टर आहे.

कसे जाणार?

पालीवरून १२ किलोमीटरवर नाडसूर हे गाव आहे. या गावाकडे जाताना पूर्वेकडे दीड किलोमीटरवर धोंडसे गावावरून चालत सुधागडवर जाता येते. साधारण दोन तास चालत जावे लागते. वाटेत नदी ओलांडावी लागते. किल्ल्यावर जाताना तीन मुख्य दरवाजे लागतात. गडावर जाणाऱ्या आता पूर्णपणे कोसळलेल्या आहेत. सुधागडवर पाच्छापूर-दर्यागाव गावावरूनही जाता येते. पालीपासून पाच्छापूर साधारण एक किलोमीटर आहे तेथे जाण्यासाठी पालीवरून एसटी व मिनिडोर आहेत. पाच्छापूर मार्गे जाताना सरळ चढण व एक लोखंडी शिडी चढून किल्ल्यावर जावे लागते, पण या मार्गावरून लवकर पोहचता येते.

सुधागड किल्ला संरक्षित झाल्यास किल्ल्याचा इतिहास सर्वांसमोर येईल. पर्यटन विकासाला चालना मिळेल. त्याद्वारे आपोआप सुधागड तालुक्याचा विकास साधला जाईल.

- दिलीप रायण्णावार, तहसीलदार, सुधागड

सुधागड किल्ल्याला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ला संरक्षित झाल्यास येथील इतिहास सर्वदूर पोहचेल. तसेच पर्यटनवाढीला चालना मिळेल. रोजगारनिर्मिती होईल.

- उमेश तांबट, मालक, सुधागड ट्रेकर्स

असा होणार फायदा

सुधागड किल्ला संरक्षित झाल्यानंतर येथील पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल. यातून रोजगार वृद्धी होईल. शिवाय विविध निधी उपलब्ध होणार आहे. रायगड प्रमाणे येथे रोपवे देखील होऊ शकतो. किल्ल्यावरील विविध वास्तूंची देखभाल दुरुस्ती केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

पाकिस्तान, श्रीलंका ते अमेरिका... जगभरातील लोक भारताकडे कसं बघतात? सर्वात मोठा सर्व्हे समोर

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

Success Story: 1.5 लाखांची नोकरी सोडली; देशी कोंबड्यांच्या व्यवसायातून आता वर्षाला 36 लाखांचा नफा!

SCROLL FOR NEXT