मुंबई

Loksabha 2019 : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे-पाटील यांचा भाजपप्रवेश

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अखेर आज सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला.

नगरच्या विखेंची नवी पिढी भारतीय जनता पक्षामध्ये असणार आहे. आजपर्यंत त्यांनी काँग्रेस पक्षासोबत निष्ठेने काम केले होते. सुजय विखे पाटील यांनी आज मुंबई आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, बबनराव पाचपुते, आमदार राहुल कुल इ. उपस्थित होते.

नगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे सुजय यांच्या भाजपा प्रवेशाला विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी विरोध केला होता. दिलीप गांधी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील असेही बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT