Summer Youth Summit 2024 sakal
मुंबई

‘समर युथ समिट २०२४’ मधून मिळणार सकारात्मक ऊर्जा;‘उत्सव तरुणाईचा’ कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची राहणार उपस्थिती

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या ‘समर युथ समिट २०२४’ची उत्सुकता शिगेला पोचली आहे. हे समिट ११ आणि १२ जून रोजी पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या ‘समर युथ समिट २०२४’ची उत्सुकता शिगेला पोचली आहे. हे समिट ११ आणि १२ जून रोजी पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे होणार आहे. या निवासी शिबिरासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण सज्ज झाले आहेत. एक दिवस आधीच ही तरुणाई पुण्यात दाखल होणार आहे.

या ‘समिट’मध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यातून विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता वाढून त्यांना योग्य दिशा मिळेल. या शिबिरात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधवी ठाकरे, खासदार ओमराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, प्रेरणादायी व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे, आमदार सत्यजित तांबे, ट्रिनिटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, उद्योजक प्रवीण ठक्कर, ह.भ.प.पंकज महाराज गावडे, सी.ए. अभिजित कोळपकर, योगतज्ज्ञ देवयानी एम, अभिनेता अक्षय केळकर, अभिनेत्री गायत्री दातार, कवी अभी मुंडे, कंटेंट क्रियेटर - डॅनी पंडित, अथर्व सुदामे, सौरभ भोसले, शंतनू रांगणेकर, गायक मंगेश बोरगावकर, गायिका सावनी रवींद्र यांच्याशी ही तरुणाई संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांना शिबिराच्या ठिकाणीसुद्धा नोंदणी करता येईल अथवा ‘यिन’ च्या अॅप वरून लगेचच ऑनलाइन नोंदणी करू शकता.

समर युथ समिट २०२४ हे यिन आणि पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून या शिबिरासाठी के.जे. कॉलेज ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्युट, महाएनजीओ फेडरेशन, ए.आय.एस.एस.एम. सोसायटी, एस.एस. मोबाईल्स आणि फ्रेमबॉक्स ऍनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, पुणे यांचे सहकार्य लाभले आहे.

अधिक माहितीसाठी

  • शंतनू पोंक्षे (पुणे शहर) ८६६८५३४१५१,

  • अक्षय बर्गे (पिंपरी चिंचवड) ८३२९०६१८३०,

  • सुजित मासाळ (बारामती विभाग) ९१३०८३१२१२

    तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांना मार्गदर्शन करण्याचे बहुमूल्य काम यिन हे व्यासपीठ करत आहे. फ्रेम बॉक्स हीसुद्धा तरुणांसाठी सर्जनशील काम करणारी व ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग, ग्राफिक्स आणि कॉमिक्ससारख्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने ‘समिट’ला हार्दिक शुभेच्छा.

-विनिता बचानी, उपाध्यक्ष,

फ्रेमबॉक्स ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, पुणे

यिन हे तरुणाईचे हक्काचे व्यासपीठ. यिनच्या माध्यमातून जे उपक्रम राबविले जात आहेत, त्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप सकारात्मक बदल घडून येत आहेत. त्यांना शिक्षणासोबतच इतर उपक्रमांमध्ये रुची निर्माण होत आहे. याच अनुषंगाने यिन समर युथ समिट मध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवावा. आम्हीदेखील या ‘समिट’चा भाग आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

-हर्षदा जाधव, व्यवस्थापकीय संचालक,

ट्रिनिटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT