Mega Block sakal
मुंबई

Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर शनिवारी- रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी -चुनाभट्टी/वांद्रे अप - डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर रविवारी दिसा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- ठाणे- कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर

कधी- मध्य रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईतून जाणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दोन्ही दिशेच्या मेल- एक्सप्रेस गाड्या १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर मार्गावर -

कुठे- सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप- डाऊन हार्बर मार्गावर

कधी- सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे. तर पनवेल/बेलापूर/वाशी आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे -

कुठे - सांताक्रुज ते गोरेगांव अप- डाऊन जलद मार्गावर

कधी - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुज ते गोरेगांव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT