sunday mumbai central railway mega block dasara festival shopping marathi news sakal
मुंबई

Mega Block : मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल !

तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकमुळे लोकल गर्दीच्या सामना करावा लागला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दसरा सणाच्या खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने मोठ्या संख्येने मुंबईकर घऱाबाहेर पडले होते. मात्र, तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकमुळे लोकल गर्दीच्या सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतल्यामुळे सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या सहाव्या मार्गिकेवर रात्रकालीन ब्लॉक घेतला होता. मात्र, रविवारी दिवसा रविवार वेळापत्रकानुसारनलोकल सेवा चालविण्यात आलेल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे.

तर हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक असल्यामुळे मानखुर्द ते नेरुळ दरम्यानची लोकल वाहतुक पुर्णपणे बंद होती. परिणामी वाशी ते पनवेल दरम्यानच्या प्रवाशांना रस्ते मार्गाने मानखुर्द स्थानकापर्यतचा प्रवास करावा लागत होता. त्यातही मानखुर्द स्थानकातून सीएसएमटीकरिता दर ३० ते ४५ मिनिटाने एक लोकल चालविण्यात येत असल्याने हार्बर वासियांना गर्दीतून प्रवास करावा लागला.

तर पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगांव ते बोरिवली अप- डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असल्याने जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळविण्यात आलेल्या होत्या. तसेच मरिनलाइन्स स्थानकांवर ऐन सकाळी चर्चगेट-बोरिवली लोकलच्या अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुट्टीच्या दिवशी खोळंबा झाला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT