धारावीत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप 
मुंबई

धारावीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा; दोन दिवसांपासून रहिवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धारावीत कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या बलिगा नगर, मुकुंद नगर, वैभव नगर इमारती सील केल्याने त्या भागातील नागरिकांचे गेल्या दोन दिवसांपासून हाल झाले. येथील रहिवाशांना आजपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा प्रशासनाकडून केला जात आहे.


कोरोनाचे रुग्ण सापडल्याने धारावीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत चार कोरोना संसर्गाचे रुग्ण येथे सापडले आहेत. रुग्ण सापडलेला परिसर कोरोनाबाधित म्हणून घोषित केला आहे. बलिगा नगर येथे दोन रुग्ण, यातील एकाचा मृत्यू झाला आहे. वैभव नगरात एक आणि मुकुंद नगरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. परिसरात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी पालिकेने विशेष खबरदारी घेतली आहे. इमारती सील केल्याने रहिवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी भाजीपाला, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या तिन्हीही ठिकाणी जंतूनाशक फवारणी करून परिसर निर्जुंतूक करण्यात येत आहे.

क्रीडा संकुलात विलगीकरण केंद्रे 
रुग्णांच्या संपर्कात आलेल्या धारावीतील व्यक्तींना येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात हलवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याने दिली. या क्रीडा केंद्रात विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. 

रहिवाशांची आरोग्य तपासणी
धारावीत ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, अशा ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविली जात आहेत. धारावी, गोवंडी आदी ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन जनजागृती करण्यात आली. कोरोनाला रोखण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदींबाबत माहिती या माध्यमातून दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT