Raj Thackeray Sabha esakal
मुंबई

Raj Thackeray Sabha: "वाटाघाटी नको पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी", राज ठाकरेंनी स्पष्ट केली राजकीय भूमिका

Raj Thackeray Sabha: राज ठाकरे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी मोदींना आपला पाठिंबा देखील जाहीर केला.

Sandip Kapde

Raj Thackeray Sabha: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा आहे भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. हे देशाचं भविष्य आहे. आता फक्त १० वर्ष आहेत. नंतर देश वयस्करांचा होईल, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेची लोकसभा निवडणुकीबाबात भूमिका देखील स्पष्ट केली.

नरेंद्र मोदी यांना पाठिंबा-

एक गोष्ट स्पष्टच सांगतो, एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो. येणाऱ्या लोकसभा निवडणुका देशाच भविष्य ठरवणार आहेत. महाराष्ट्रला मोठा वाटा हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मला अपेक्षा आहेत. मी फक्त मोदींसाठी पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितलं. मला वाटाघाटी नको. राज्यसभा नको, लोकसभा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात चुकीचा कॅरम फुटला. आज मारामाऱ्या सुरु आहेत. विधानसभेत तर कोथळे बाहेर काढतील. माझी महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे व्यभिचाराला राजमान्यता देऊन नका, पुढील दिवस भीषण आहेत.

मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, "राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल."

यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. विधानसभेच्या तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT