Supriya Sule  sakal
मुंबई

राणा दाम्पत्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, जर एकच नाणं...

मुख्यमंत्र्यांवर कितीही हल्ले झाले तरी, ते एकही शब्द बोलत नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्र्यांवर कितीही हल्ले झाले तरी, ते एकही शब्द बोलत नाही. यावरून ते किती सुस्कृंत आहेत हे कळून येत आहे. त्यांच्यावर झालेले संस्कांर जे मराठी आणि भारतीय संस्कार आहेत याचं खरंच कौतुक आणि अभिमान वाटतो असं त्या म्हणाल्या. गेल्या 55 ते 60 वर्षांपासून एका माणसाचं नाव घेऊन जर हेडलाईन होत असेल तर, त्या माणसाचं नाणं बाजारात किती खपतं याचंच एक उदाहरण असल्याचं उत्तर सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी शरद पवारांबद्दल विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना दिलं आहे. (Supria Sule On Sharad Pawar)

त्या म्हणाल्या की, प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो, त्या प्रमाणे ते बोलत असतात. मात्र, आम्ही संविधानाचा विचार करून राजकारणात आलो आहे याचा विचार मी स्वतः नेहमी करत असते. तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांची कामं करण्यासाठी राजकारणात आले आहे असे त्या म्हणाल्या. ही बाब नागरिकांना कामातून दिसून येत असून, यामध्ये नेहमी सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न असतो असे, सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राणा दाम्पत्याने आज सकाळी मातोश्री बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले असून, राणा दाम्पत्याला मातोश्री बाहेर येऊ न देण्यासाठी हजारो शिवसैनिक कालपासून मातोश्री बाहेर ठाण मांडून बसले आहेत. तसेच राणा यांच्या खार येथील घराबाहेरदेखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहेत. दरम्यान, या सर्व घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT