Supriya Sule Sakal
मुंबई

Supriya Sule : एकाच मेट्रो प्रकल्पाचे सहाव्यांदा उद्‌घाटन,खासदार सुप्रिया सुळे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सहाव्यांदा मेट्रो प्रकल्पाच्या उद्‌घाटनावर टीका केली, संविधानाच्या चौकटीत काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी भाजपच्या राजकीय आव्हानांना मराठी स्वाभिमान कायम असल्याचे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बोलावून नागरिकांना त्रास होईल, असे प्रशासनाने काही करू नये. कारण यापूर्वी त्याच प्रकल्पाचे पाच वेळा उद्‌घाटन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना राज्य सरकारने सहाव्यांदा त्याच कामासाठी त्यांना पुण्यात का बोलविले होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लगावला.

सुळे म्हणाल्या, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात ज्या मेट्रो प्रकल्पाच्या उद्‌घाटनासाठी येणार होते, त्याचे आतापर्यंत पाच वेळा उद्‌घाटन झाले आहे. हा प्रकल्प एकच आहे. मात्र, त्याचे पुन:पुन्हा उद्‌घाटन केले जात आहे.

सुळे म्हणाल्या...

  • सरकारने संविधानाच्या चौकटीत काम करावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहेत, बदलापूरप्रकरणी त्यांचे वागणे योग्य नाही.

  • हा देश बंदुकीवर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो, हे लक्षात घेणे गरजेचे

  • फडणवीस जितक्या वेळी आमच्यावर बंदूक रोखतील तितक्या वेळी आम्ही त्यांना संविधान दाखवू

  • मराठी माणसाच्या पराभवासाठी अमित शहा, भाजप लढत आहेत. ते पक्ष आणि चिन्ह घेऊन जातील पण मराठी माणसांचा स्वाभिमान कधीही घेऊन जाऊ शकणार नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

Ramdas Athawale: अभिजित दीपके यांना रामदास आठवलेंचे RPIत येण्याचे निमंत्रण; ‘सुशिक्षित युवा नेतृत्वाची गरज’

Latest Marathi News Live Update : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; पाच जण जखमी

Amit Thackeray: ‘रस्त्यात डांबर, पेव्हर ब्लॉक अन् काँक्रीटचा पॅच; हा कसला विकास?’ अमित ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

SCROLL FOR NEXT