मुंबई

मलबार हिलचे सर्वेक्षण सुरु; जलवाहिन्या दुरूस्तीच्या कामामुळे रविवारपर्यंत 'या' परिसरात टॅंकरने पाणी पुरवठा

समीर सुर्वे

मुंबई : बुधवारी मध्यरात्री दरड कोसळलेल्या मलबार हिल टेकडीच्या भागाचे भू-तांत्रिक (जीओ टेक्निकल) सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. दोन दिवसात या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर एन.एस.पाटणकर मार्ग (पेडर रोड) सुरु करण्या बाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरड कोसळल्यामुळे फुटलेल्या जलवाहीन्याच्या ठिकाणी पर्यायी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम रविवार पर्यंत सुरु राहाण्याची शक्यता आहे.  तोपर्यंत ग्रॅन्टरोड, मलबार हिलच्या परीसरातील काही भागात टॅंकरने पाणी पुरवठा होणार आहे. वाळकेश्वर ते केम्स कॉर्नरपर्यंतच्या मलबार हिल टेकडीवरुन येणारा बी.जी.खेर मार्ग कमला नेहरु उद्यानाच्या काही अंतरावर खचला. रस्त्याला तडा जाऊन तो भाग तीन ते चार फुट खचला आहे. मलबार हिल टेकडीचा हा भाग मातीचा असून दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आहे. त्यामुळे या भागाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल दोन दिवसात पालिकेला सादर होईल. त्यानंतर वाहून गेलेला भाग कोणत्या पध्दतीने सुरक्षित करायचा या बाबत निर्णय होईल. असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. .मात्र,यात अखेर मार्ग बंदच राहाणार आहे.

पेडर रोडवर कोसळलेली दगड माती हलविण्यात आली आहे.मात्र, तत्काळ हा रस्ताा सुरु होण्याची शक्यताही कमी आहे. सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर रस्ता वाहतुकीला सुरु करण्या बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ही दरड कोसळल्यामुळे डोंगरवाडी येथे चार जलवाहीन्या फुटल्या आहेत. तेथे पर्यायी जलवाहीन्या टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम पुढील दोन दिवस सुरु राहाणार आहे. त्यामुळे ग्रन्टरोड, मलबार हिल परीसरातील काही भागात टॅकरने पाणी पुरवठा होणार आहे.

मोठा धोका टळला 
दरड कोसळण्यास सुरवात झालेल्या भागापासून दक्षिण मुंबईला पाणीपुरठा जलकुंभ आहे. त्यात नियमीतपणे 140 दशलक्ष लिटर पर्यंत पाणीसाठा असतो.मुंबईतील हा दुसरा जलकुंभ असून 30 मार्च 1875 रोजी बांधण्यात आला आहे. या जलकुंभावरच कमला नेहरु उद्यान आहे.सुदैवाने कोसळलेल्या दरडीमुळे या जलकुंभाला कोणाताही धोका पोहचला नसल्याचे पालिकेच्या अधिकार्याने सांगितले. मात्र, सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. असेही सांगण्यात आले.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT