sushant singh rajput last video, sushant singh rajput, sushant singh rajput birthday SAKAL
मुंबई

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अनिल देशमुखांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; परमबीर सिंह यांचे गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी याबाबत नवा आरोप केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्ररकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बॉलिवूडवर दबाव टाकण्याचे आदेश दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. एका वृत्तवाहिला मुलाखत देताना त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु होण्याची शक्यता आहे. तसंच नुकतेच देशमुखांनी आपल्यावर केलेल्या आरोपांवरही परमबीर सिंह यांनी भाष्य केलं आहे.

देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलंय

परमबीर सिंह म्हणाले, "माझ्यावर केलेले आरोप बोगस आणि बेछुट आहेत. अनिल देशमुख यांच्या सुपीक कल्पनाशक्तीतून हे आलेले आहेत. त्यांच्या मानसिक स्थितीवर मला थोडीशी चिंता वाटते. कारण अशा प्रकारे मानसिक संतुलन बिघडलेला एक व्यक्ती या राज्याचा गृहमंत्री राहिला आहे. अजूनही एक वरिष्ठ नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. हे आरोप ते नैराश्यातून करत आहेत की आणखी काय मला माहिती नाही. मला राजकारण जास्त काही कळत नाही. आजपर्यंत मी कधी मीडियासमोर आलो नव्हतो पण आता मला मीडियासमोर यावं लागलं कारण माझ्यावर अनिल देशमुख यांनी पुन्हा आरोप केले आहेत.

वसुलीची माहिती उद्धव ठाकरे, शरद पवारांना होती

मी अनिल देशमुखांविरोधात केलेले १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप खरे होते. कारण माझ्याकडं वैयक्तिक माहिती होती तसंच अधिकाऱ्यांकडूनही मला ही माहिती मिळत होती. अनिल देशमुखही बोलता बोलता म्हणायचे की त्यांना पक्षाकडून पैसे गोळा करायचं टार्गेट होतं. त्यांचं टार्गेट १०० कोटींहून अधिक होतं. पोलिसांच्या बदल्या, मुंबईतील धंद्यांमधून त्यांच्या डील होत होत्या. त्यांचे सुपुत्र ललित हॉटेलमध्ये बसून याबाबत डील करत होते. त्यामुळं त्यांचं टार्गेट मोठं होतं. माझ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा पुरावा असलेलं पत्रही मी मुख्यमंत्र्यांनाही दिलं होतं.

जेव्हा ही वसुलीची बाब माझ्या कानावर आली तेव्हा मी तत्कालीन मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंना भेटलो, ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काही मंत्र्यांना भेटून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली होती. पण त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं कारण त्यांना याची संपूर्ण माहिती होती. त्यामुळं मला त्यात त्यांना कारवाई करण्यात रस नसल्याचं लक्षात आलं होतं.

सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडवर दबाव टाकण्याचे आदेश

अनिल देशमुख यांना फिल्म इंडिस्ट्रीत विशेष रस आहे. कारण मला अशी माहिती मिळाली होती की, एकेकाळी त्यांनाही फिल्मी हिरो बनायचं होतं. त्यामुळं ते कायम म्हणायचे की मोठे दिग्दर्शक, कलाकारांना आपण बोलवलं पाहिजे. कारण यामुळं लोक त्यांच्याकडं धावत येतील, त्यातून त्यांचा प्रभाव बॉलिवूडमध्ये वाढेल. सुशांतसिंह प्रकरणात तपासादरम्यान आमच्यासमोर जी नावं आली त्यांनाच आम्ही चौकशीसाठी बोलावलं होतं.

एक निवृत्त दिग्दर्शकानं ट्विट केलं होतं की, "सुशांत सिंह राजपूतला फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनी कसा दबाव टाकला होता. यासंदर्भात काही लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण अनिल देशमुख हे वारंवार बोलायचे की जास्तीत जास्त कलाकारांना चौकशीसाठी बोलवलं जावं, त्यांच्यावर दबाव टाकला जावा, असे गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT