मुंबई

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः गौरव आर्याची ईडीकडून चौकशी

अनिश पाटील



मुंबई - बॉलीवुड अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाला दिवसे-दिवस वेगळे वळण लागत असुन, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) समन्वयाने तपास करत आहेत. सुशांत सिंग प्रकरणी ईडीने गौरव आर्याची तर सीबीआयने रिया चक्रवर्ती, सुशांतची बहिण मितु सिंग आणि सिद्धार्थ पिठाणीची चौकशी केली. यावेळी सीबीआयच्या एक पथकाने सुशांतच्या घराचीही पाहणी केली.  

 गौरव आर्या सोमवारी सकाळी 11 वाजता ईडी कर्यालयात दाखल झाला. यावेळी त्याला प्रसारमाध्यमानी घेरले असता, उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना आपला याप्रकरणाशी काही संबध नसल्याचे त्याने सांगितले. गौरवने रविवारी गोव्याहून मुंबईसाठी निघताना सांगितले होते की, तो 2017मध्ये रिया चक्रवर्तीला भेटला होता. त्यानंतर तो रियाला भेटला नाही. तसेच सुशांत सिंह राजपूतला तो केव्हाच भेटला नसल्याचेही त्याने सांगितले होते. याबाबतच ईडीने गौरवची चौकशी केली.त्याने रिया सातत्याने फोन तसेच मेसेज केल्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.  गौरवच्या गोव्यातील द टमरिण्ड हॉटेलसह दुबईमध्ये भागीदारीत अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्तेत कर्नाटकच्या आमदाराची देखील भागीदारी असल्याचे समोर आले आहे. नेमकी ही भागीदारी कशाप्रकारची आहे, याबाबतही ईडीने प्रश्न विचारले. तसेच कुठे कुठे मालमत्ता आहेत ? याबाबतही गौरवला विचारण्यात आले. मात्र त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे ईडीतील सुत्रांनी सांगितले.
  दरम्यान, गौरव आर्याच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी त्याच्या भागिदारांनाही बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कासीम आझमीचे नाव पुढे येत आहे. त्याबाबत गौरवकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

रिया, मितु सिंग-सिद्धार्थ पिठाणीची सीबीआय चौकशी
रिया चक्रवर्तीची सलग चौथ्या दिवशी सीबीआयच्या पथकाने सोमवारी चौकशी केली. आतापर्यंत रियाची 25 तास चौकशी सीबीआने केली आहे.  सीबीआयने सोमवारी सुशांतची बहिण मितु सिंग आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यांच्या समोर रियाची चौकशी केली. या चौकशीदरम्यान, मितुने 8जुन ते 14 जुन पर्यंतचा सर्व घटनाक्रम सांगितला. घटनाक्रमाची सिद्धार्थकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी मितुकडून करण्यात आली

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT