मुंबई

Live Update : सुशांतसिहवर विलेपार्ले स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय आता थोड्याच वेळेत साधारण २ ते २.३० पर्यंत मुंबईत पोहोचणार आहे. त्याची एक बहीण मुंबईतच राहते. तिला खूप मोठा धक्का बसला आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी ही घटना जेव्हा समजली तेव्हा ते चक्कर येऊन पडले. पटना येथून ही मंडळी विमानाने येत आहेत. दुपारपर्यंत ते मुंबईत येतील.  त्यानंतर आज संध्याकाळी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

Live update

3:00 pm _ अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय आता त्याच्या वांद्रे येथील घरी पोहोचलेले आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी केवळ आठ ते दहा जणांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामध्ये त्याचे वडील के. के. सिंह, भाऊ नीरज कुमार सिंह, त्यांचा मुलगा राजवर्धन आणि रवीवर्धन. तसेच सुशांतच्या बहिणी हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे ओएसडी ओमप्रकाश सिंह अशा काही मंडळींचा समावेश आहे. सुशांतच्या वाद्रे येथील घराजवळ चाहत्यांची गर्दी उसळली आहे. पोलिसांनी गर्दीला पांगविले आहे. तसेच आज दुपारी कूपर रुग्णालयात जाऊन सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने त्यांचे अंत्यदर्शन घेतले. कूपर रुग्णालयातून सुशांतचा मृतदेह विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत आणण्यात येणार आहे आणि
साधारण साडेचार वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. 

1:30 pm : सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह, चुलतभाऊ नीरजकुमार बबलू आणि दोन स्त्रिया पटनाहून मुंबई आंतरराष्ट्रीय टी 2 टर्मिनलवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT