मुंबई

चारित्र्याच्या संशयातून पत्नी व मुलीचा खून करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा


नवीन पनवेल : पनवेल परिसरात 2016 साली दुहेरी हत्याकांड घडले होते. आरोपीने पत्नीसह सहा वर्षांच्या मुलीचा खून केला होता. त्यानंतर दोघींचे मृतदेह पनवेल व न्हावा-शेवा परिसरात रस्त्यालगत फेकून ही घटना अपघात असल्याचे भासवले होते. तब्बल साडेतीन वर्षे या घटनेतील आरोपी फरारी होता. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर बुधवारी (ता.29) आरोपीला पणजी येथून पकडण्यात यश आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. 
13 जून 2016 ला एका अनोळखी महिलेचा, तसेच सहा वर्षीय मुलीचा मृतदेह जेएनपीटी व गव्हाण फाटा येथे सापडला होता. त्याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. जेजुरी पोलिस ठाणे, पुणे या ठिकाणी या दोन व्यक्ती हरवल्या असल्याची नोंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दुहेरी खुनाचा तपास पनवेल पोलिसांनी सुरू केला. गुन्ह्यातील फरारी आरोपी श्रीमंत अण्णा नागरगोजे (38 रा. माण, जिल्हा, सातारा) याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी सुषमा नागरगोजे व सहा वर्षे वयाच्या मुलीचा खून करून फरारी झाला होता.

पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश दळवी, पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे, बाबाजी थोरात, विजय आहिरे, अजय वाघ, पंकज पवार, अनिल मानकर यांच्या विशेष पथकाने श्रीमंत नागरगोजे यास पणजी, गोवा येथून ताब्यात घेतले. तब्बल साडेतीन वर्षांनंतर त्याला अटक करण्यात आली. तो गोवा या ठिकाणी श्रीपाल यादव असे नाव बदलून वेटरचे काम करत होता. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT