Mumbai Crime News Updates Esakal
मुंबई

Mumbai Crime: आईचा मृत्यू तर वडील सांभाळत नाहीत; चोर असल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन भावंडांची निर्वस्त्र धिंड

Mumbai Crime News Updates: या वृद्ध महिलेचे १७ आणि १४ वर्षे वयाचे नातवंडेही तिच्यासोबत राहतात. या मुलांनी काही वर्षांपूर्वी त्यांची आई गमावली आहे. तर त्यांचे वडील त्यांना सांभाळत नाहीत.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकच कायदा हातात घेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. आता मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे चोर असल्याच्या संशयातून दोन अल्पवयीन मुलांना बांधून ठेवत त्यांना विवस्त्र करत धिंड काढल्याचे समोर आले आहे.

विलेपार्ले पश्चिम येथील चाळीत राहणाऱ्या ६० वर्षीय आजीच्या तक्रारीवरून या प्रकरणातील तक्रार नोंदवण्यात आली आहे. या वृद्ध महिलेचे १७ आणि १४ वर्षे वयाचे नातवंडेही तिच्यासोबत राहतात. या मुलांनी काही वर्षांपूर्वी त्यांची आई गमावली आहे. तर त्यांचे वडील त्यांना सांभाळत नाहीत.

विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू परिसरात चोर असल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन मुलांना रात्रभर बांधून ठेवत त्यांना मारहाण करत केस भादरून परिसरातून विवस्त्र धिंड काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी सुरज पटवा याच्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सोमवारी विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायडू चाळीत हा प्रकार घडला आहे. आपल्या आजी सोबत राहणाऱ्या 17 आणि 14 वर्षीय अल्पवयीन मुलांवर चोरीच्या संशयातून त्यांना रात्रभर डांबून ठेवून मारहाण करत केस भादरलेल्या आणि निर्वस्त्र अवस्थेत लोखंडी साखळीने बांधून मारहाण करताना परिसरातून त्यांची दिंड काढतानाचा व्हिडिओ आजीच्या नजरेस पडल्यानंतर आजीने जुहू पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT