Suspecting illegal transport Kalyan police attempt to kill police accused arrest after 2 years​ esakal
मुंबई

Mumbai Crime : पोलिसांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी चढवण्याचा केला होता प्रयत्न; आरोपीला तब्बल 2 वर्षांनी ठोकल्या बेड्या

अवैध वाहतुकीचा संशयाने कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गोविंदवाडी परिसरात एक गाडी अडवली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अवैध वाहतुकीचा संशयाने कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गोविंदवाडी परिसरात एक गाडी अडवली. मात्र गाडी चालक तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्याच्या उद्देशाने भरधाव वेगाने गाडी पोलीस कर्मचाऱ्यांचा अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला व तेथून पसार झाला होता. दोन वर्षापूर्वी ही घटना घडली होती.

आरोपी सूरज उर्फ बारक्या याचा पोलीस शोध घेत होते. अखेर गोविंदवाडी परिसरातून पोलिसांनी सापळा रचत बारक्याला अटक केली आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेकडे गोविंदवाडी एपीएमसी परिसरात कल्याण बाजारपेठ पोलिसांची चेकिंग सुरू होती.

या दरम्यान एका गाडीतून त्यांना अवैध वाहतूक सुरू असल्याचा संशय आला. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी चालक तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्याचा उद्देशाने गाडी भरधाव वेगाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने पोलीस कर्मचारी प्रसंगावधान राखत बाजूला सरकले. त्यामुळे मोठा अनर्थ ठरला मात्र याच दरम्यान हा गाडी चालक पसार झाला होता.

याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत गाडी चालक चालकाचा शोध सुरू केला. त्याची ओळख पटवली असता हा तरुण अवैध वाहतुकीच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी असल्याची माहिती समोर आली.

तब्बल दोन वर्ष बारक्या पोलिसांना चकवा देत होता. अखेर हा तरुण कल्याण गोविंदवाडी परिसरातील एका इमारती जवळ येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अरून घोलप यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे घोलप यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला.सुरज खैरीराम कायरिया उर्फ बारक्या हा या परिसरात येताच बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर झडप टाकत त्याला बेड्या ठोकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : तळोज्यात १ कोटींच्या अमली पदार्थांवर पोलिसांची कारवाई; दोघे जेरबंद

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT