मुंबई

ST च्या 'त्या' 31 कर्मचाऱ्यांचे  निलंबन रद्द होणार; परिवहनमंत्र्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश

प्रशांत कांबळे


अलिबाग : अलिबाग आगारातील 31 कर्मचाऱ्यांना चार दिवसांपूर्वी तडकाफडकी निलंबित केले होते. या सर्वांचे निलंबन मागे घेण्‍यात यावे; तसेच या संदर्भातील प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश परिवहनमंत्री अनिल परब यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्‍यासाठी अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांना अलिबाग ते दादर व दादर–पनवेल या मार्गांवर ड्युटी लावली होती. परंतु, या मार्गावर काम करण्‍यास अलिबाग आगारातील  कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता. त्‍यामुळे आगारातील 15 चालक व 16 वाहकांवर 31 जुलै रोजी निलंबनाची कारवाई करण्‍यात आली. विभाग नियंत्रकांनी केलेल्‍या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्‍ये असंतोषाचे वातावरण होते. सोमवारी अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या कारवाईबद्दल निषेध नोंदवला; तसेच आगार व्‍यवस्‍थापक अजय वनारसे यांची भेट घेऊन हे निलंबन अन्‍यायकारक असून ते मागे घ्‍यावे, अशी मागणी निवेदनातून केली होती. प्रशासकीय पातळीवर कोणत्‍याच हालचाली होत नसल्‍याने कर्मचाऱ्यांमधील असंतोष वाढत होता. 

अखेर मंगळवारी (ता. 4) कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री अदिती तटकरे व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्‍यासह मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आपली भूमिका मांडत निलंबन मागे घेण्‍याची विनंती केली. या वेळी एस. टी. कामगार सेना अलिबाग युनिटचे अध्‍यक्ष दिलीप पालवणकर व सचिव प्रसन्‍ना पाटील यांनी हे निलंबन कसे अन्‍यायकारक आहे, हे परिवहनमंत्र्यांना पटवून दिले. त्‍यानंतर कामगारांची बाजू समजून घेत परब यांनी निलंबनाची कारवाई मागे घेण्‍याचे आदेश यंत्रणांना दिले. त्‍यानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे. निलंबन उठवण्‍यात येत असल्‍याचे रायगडच्‍या विभाग नियंत्रक अनघा बारटक्‍के यांनी सांगितले .

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Satara Politics: सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काऊंटडाऊन सुरू; शासनाकडून २० मार्चपर्यंत मुदत, सत्तेच्या कोंडीमुळे वाढली उत्सुकता!

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT