मुंबई

मोठी बातमी - सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यालाच CBI नोटीस ?

राजू परुळेकर

मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होतायत. CBI ने मुंबईत तपासाचा धडाका लावलाय. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सुशांतच्या घरी जाऊन त्या दिवशी काय घडलं असू शकतं याचं रिक्रिएशन देखील केलं होतं.  

दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबईच्या एका पोलिस अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीसाठी नोटीस बजावल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या तपास अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सीबीआयने नोटीस पाठवली असली तरी चौकशी करणार कशी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

याप्रकरणात सुशांतवर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांचा जबाब नोंदवून सुशांतने नैराश्येतून आत्महत्या केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहचले होते. मात्र नैराश्येच्या कारणाबाबत पोलिसांना अद्याप ठोस माहिती देता आली नाही. त्याचप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयने या तपास अधिकाऱ्याला नोटीस पाठवल्याची माहिती आहे.

दरम्यान, वरिष्ठांच्या सुचनेनूसारच पोलिस या नोटीसीला उत्तर देणार असल्याचेही कळते.  त्यामुळे यातून नेमके  काय समोर येते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

suushant singh rajput case cbi sends notice to one of the mumbai police officer

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT