Fahad Ahmed ESakal
मुंबई

Swara Bhaskar चे पती विधानसभा निवडणूक लढवणार? मुंबईतील 'या' मतदारसंघातून उमेदवारी मिळणार

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी इच्छूक उमेदवार समोर येत आहे. अशातच आता स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांचेही नाव पुढे आले आहे.

Vrushal Karmarkar

महाराष्ट्रात अद्याप विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत किंवा कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही, परंतु नेते आधीच त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या संभाव्य जागांसाठी प्रचार करत आहेत. एमव्हीएचा भाग असलेल्या समाजवादी पक्षाला मुंबईच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची पूर्ण आशा आहे.

या जागेवर अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. या जागेचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे नवाब मलिक आहेत. मात्र सध्या मलिक हे अजित पवारांच्या गटात असून त्यांची प्रकृतीही बिघडली आहे. अशा स्थितीत मलिक यांच्याकडून निवडणूक लढण्याची फारशी आशा नाही. त्यांची मुलगी या जागेवरून उमेदवार असू शकते. अशा परिस्थितीत स्वराचा पती फहाद यांच्याशी तिची स्पर्धा निश्चित मानली जात आहे.

स्वराचा पती फहाद हे सामाजिक चळवळीतून राजकारणात आले आणि सपामध्ये दाखल झाले. आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली जागा जाहीर न करताही फहाद यांनी बैठक बोलावली. त्यात राष्ट्रवादीच्या शरद गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे स्वत: उपस्थित होत्या.

यात सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत भाजपने केलेल्या अत्याचाराची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यासारखे लोक तुरुंगात असताना भाजपला शरण आले नाहीत, पण नवाबभाईंनी पाठ फिरवली, असेही सुप्रिया म्हणाल्या. नवाब मलिक यांच्याशी असलेल्या नातेसंबंधाचा दाखला देत त्या म्हणाल्या की, पक्ष आणि मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे. तुरुंगात तसेच रुग्णालयात भेटायला गेलो होतो. आता भाजपने नवाब मलिक चांगले असल्याचे सांगितले तर भाजपने नवाब मलिक आणि राष्ट्रवादीची माफी मागावी, असेही सुप्रिया म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT