Sylvester daCunha 
मुंबई

Sylvester daCunha : 'अमूल बटर गर्ल'चे जनक सिल्वेस्टर डा-कुन्हा यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई, : अटर्ली बटर्ली डिलीशीयस' या अमूलच्या ऑयकॉनीक जाहिरातीचे जनक आणि जाहिरात विश्वातील एक मोठ नाव असलेल्या सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे मंगळवारी (ता.२०) उशीरा रात्री मुंबईत निधन झाले. ते ८० वर्षाचे होते.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे संचालक जयेन मेहता यांनी याची माहिती दिली. १९६६ पासून सुरु झालेली अमूल गर्लची जाहिरात देशभरात अतिशय लोकप्रिय ठरली आहे. चालू घडामोडीवर अचूक भाष्य करणारी अमूलची जाहिरात जगात सर्वाधिक काळ सुरु असणारी जाहिरात आहे.२०१६ मध्ये या जाहिरातीला ५० वर्षे पुर्ण झाले.

१९६६ पासून अमूल परिवारासोबत जुळलेले डा कुन्हा यांचे निधन झाले असून त्यांच्या कुटुबियांच्या दुखात अमूल परिवार सहभागी असल्याचे ट्विट जयेन मेहता यांनी केले.

१९६६ मध्ये देशाचे दूध क्रांतीचे प्रणेते डॉक्टर वर्गीस कुरीयन यांच्या नेतृत्वातील गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटींग फेडरेशनला अमूलचा ब्रँड देशव्यापी न्यायचा होता. त्यासाठी एक जाहिरात मोहीम सुरु करण्याचे त्यांनी सिल्वेस्टर डा-कुन्हा यांना सांगीतले. त्यांनी ही मुलगी या जाहिरातीची मॅस्कोट म्हणून घ्यायची सुचना दिली.

त्यावरुन डा-कुन्हा यांनी कला दिग्दर्शक फर्नाडीस यांच्या सहकार्याने अमूलची कॅम्पेन उभी केली. एकाच पात्रावर आधारलेली ही जाहिरात देशातील सर्वाधिक लाब काळ चालणारी जाहिरात ठरली. चालू घडामोडींवर अचूक भाष्य करणाऱ्या अमूल गर्लच्या जाहिराती आजही तेवढच्या लोकप्रिय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT