मुंबई

रस्त्यावरील सरबत धोकादायकच! 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात थोडासा गारवा म्हणून रस्त्यात कुठेही मिळणारे लिंबू सरबत वा उसाचा रस पिण्याचा किंवा बर्फाचा गोळा खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, असे रस आणि सरबत आरोग्याला धोकादायक ठरत आहे. पालिका पथकांच्या तपासणीत रस, सरबत आणि बर्फांचे ८१ टक्के नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत. म्हणूनच रस्त्यावरील सरबत पिणे टाळा, असा सल्ला डॉक्‍टरही देत आहेत.

कुर्ला रेल्वेस्थानकातील एका कॅन्टीनमध्ये गलिच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिका खडबडून जागी झाली. पालिकेच्या पथकांनी सरबत, उसाचा रस आणि बर्फगोळा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली. महिनाभरात करण्यात आलेल्या तपासणीत ८१ टक्के नमुने दूषित आढळून आले. मार्चमधील कारवाईत ८७ टक्के नमुने दूषित होते. त्यामुळे रस्त्यावर मिळणारे सरबत पिणे आजारपणाला निमंत्रण ठरण्याची शक्‍यता आहे. 

पालिकेने फेरीवाल्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत ८० टक्‍क्‍यांहून जास्त नमुने आरोग्यासाठी घातक असल्याचे समोर येत आहे. मार्चमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतील आकडेवारी ८६ टक्के होती. दरम्यान, मुंबईत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) सरबत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. रेल्वे प्रशासनाने तर स्थानकांवरील लिंबू सरबत आणि कालाखट्टावर बंदी घातली आहे.

दूषित नमुने 
लिंबू सरबताच्या २८० पैकी फक्त ६२ नमुने पिण्यायोग्य 
२१८ दूषित 
ऊसाच्या रसाच्या ३०३ पैकी फक्त ३५ नमुने पिण्यायोग्य 
२६८ दूषित
बर्फाच्या ३८५ पैकी फक्त ८५ नमुने पिण्यायोग्य 
३०० दूषित

मुंबईतील पदपथावर उघड्यावर अन्नपदार्थ आणि सरबत विकले जाते. असे पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा. आरोग्याला ते धोकादायक आहे. घराबाहेर पडताना स्वच्छ पाणी स्वत:जवळ ठेवणे गरजेचे आहे. 
- पद्मजा केसकर, आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT