indian navy and kdmc smart city Memorandum of Understanding sakal
मुंबई

कल्याणच्या खाडी किनारी T-80 युद्ध नौका होणार विराजमान

कल्याण खाडी किनारी नदी किनारा विकास प्रकल्पांतर्गत आरमार स्मारक उभारले जाणार आहे.

शर्मिला वाळुंज

कल्याण खाडी किनारी नदी किनारा विकास प्रकल्पांतर्गत आरमार स्मारक उभारले जाणार आहे.

डोंबिवली - कल्याण खाडी किनारी नदी किनारा विकास प्रकल्पांतर्गत आरमार स्मारक उभारले जाणार आहे. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड हे स्मारक उभारले जाणार असून भारतीय नौदलाची युद्धनौका T-80 ही देखील आता या स्मारकाचा एक भाग होणार आहे. भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात नुकताच हा ऐतिहासिक सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भारतीय नौदलाचा कल्याण डोंबिवली तसेच राज्याच्या समृद्ध नौदल वारसा इतिहासाशी कायमचा संबंध जोडला जाणार असून शहराला पर्यटनासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या 356 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत दुर्गाडी किल्ला, कल्याण येथे स्मारक स्वरूपात भारतीय नौदलाची युद्धनौका T-80 विराजमान करण्यासंदर्भात भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SKDCL) यांनी बुधवारी हा करार केला. यावेळी भारतीय नौदलाचे मुख्यालय महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे अधिकारी कमोडोर जिलेट कोशी, कमांडर अभिषेक कारभारी, कॅप्टन पी. के. मन्ना, लेफ्टनंट अरुण कुमार, लेफ्टनंट सोम प्रकाश आणि लेफ्टनंट अर्जुन पंडित यांसह स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, हेरीटेज सल्लागार सचिन सावंत आदी उपस्थित हाेते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय किनारपट्टीचे परकीय आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी कल्याण दुर्गाडी येथे मराठा आरमाराची स्थापना केली. या घटनेचा सार्थ अभिमान पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहावा,यासाठी कल्याणच्या उल्हास नदीकिनारी आरमार स्मारकाच्या रूपात पुरातन असा वारसा स्मारक उभारण्याची कल्पना कल्याणचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून निघाली. कल्याणचा प्राचीन इतिहास आणि नाविक वारशाला साजेसं एक पर्यटन स्थळ निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. डॉ. सुर्यवंशी यांच्यानंतर या प्रकल्पाची धुरा नवनिर्वाचित आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे आली. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते कार्यरत आहेत.

आरमार कसे असेल...

प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्याचा समृद्ध सागरी इतिहास हे स्मारक दर्शवेल. तसेच कायमस्वरूपी सार्वजनिक प्रदर्शनात भारतीय नौदलाच्या अनेक प्रेरणादायी घटना चित्रे, शिल्पे, कलाकृती आणि मल्टिमिडीयाच्या रूपात मांडले जातील. नियोजनाच्या टप्प्यापासूनच हा प्रकल्प भारतीय नौदलातील अधिकारी आणि अभ्यासकांच्या सक्रिय सहभागासह विकसित केला गेला आहे. भारतीय नौदल आणि SKDCL यांच्यातील सहकार्यामध्ये विविध टप्प्यांमध्ये अभ्यास दौरे, अभिलेखीय ऐतिहासिक सामग्रीची देवाणघेवाण आणि आता खुद्द T-80 युद्धनौकेचे कायमस्वरूपी प्रदर्शन यांचा समावेश आहे.

याच स्मारकाचा भाग असेल आता T - 80 युद्ध नौका

इंडियन नेव्हल फास्ट अटॅक क्राफ्ट (Ex T-80) ही युद्धनौका 24 जून 1998 रोजी भारतीय नौदलात कार्यान्वित झाली होती. हे जहाज विशेषतः उथळ पाण्याच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात आले होते आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त घालण्यात ही युद्धनौका कायम तत्पर राहिली. प्रदीर्घ सेवेनंतर 7 ऑक्टोबर 2021 ला ती सेवानिवृत्त झाली. इस्त्राईल येथे मेसर्स आयएआय रामता यांनी बांधलेली ही युद्धनौका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ready Reckoner Rates Unchanged : घर, जमीन घेणे महाग होणार नाही; रेडीरेकनर दर ‘जैसे थे’च, राज्य सरकारचा निर्णय

Parbhani News: शेणखताची ट्रॉली झाली साडेतीन हजाराला!; पशुधन घटल्याने दरात वाढ; खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

Pune News: पालखी सोहळ्याचा पुणे मुक्कामाचा निर्णय समन्वयातून घेणार: ॲड. राजेंद्र उमाप, १३ एप्रिलला अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल!

मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा! २ एप्रिलला रंगणार 'मिमा २०२६’चा सोहळा

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

SCROLL FOR NEXT