मुंबई

हुश्श! बरं झालं "हे" तबलीगी कोरोनाबाधित नव्हते, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा

कल्याण: कल्याणच्या बाजारपेठ पोलीसांनी ताब्यात घेतले 24 तबलिगी कोरोना बाधित नसल्याचा खुलासा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रशासनाने केला आहे. हे सर्व तबलीगी दिल्लीचे असल्यामुळे संचारबंदी काळात त्यांना परत पाठवणे अशक्य आहे. त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात पालिकेच्या डोंबिवली येथील बीएसयुपी निवारा कक्षात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी या तबलिगींचे स्थलांतर करावे अशी मागणी ट्विटर द्वारे केली होती. 

दिल्ली येथून आलेले हे 24 नागरिक 12 ते 14 मार्च दरम्यान कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी परिसरातील बिलाल मज्जित येथे वास्तव्यास होते. त्यानंतर 14 ते 31 मार्च दरम्यान ते भिवंडी येथे वास्तव्यास होते. एक एप्रिल रोजी बाजारपेठ पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील दोन इमारतींमध्ये असलेल्या या 24 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, तसेच त्यांना 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. या सर्व नागरिकांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आली होती. 

प्रशासनाशी चर्चा करण्याचे आवाहन
संचारबंदीच्या काळात त्यांना दिल्ली येथील त्यांच्या मूळ गावी पाठवणे अशक्य आहे. यामुळेच पालिकेने डोंबिवली येथील बीएसयुपी निवारा कक्षात त्यांची व्यवस्था केली आहे. मात्र या तबलीगींच्या वास्तव्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असल्याचे सांगत पाटील यांनी त्यांच्या स्थलांतराची मागणी केली होती. पालिका प्रशासनाने कोणाचेही नाव न घेता अशा माहितीबाबत पालिका प्रशासनाशी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून माध्यमांशी चर्चा करावी असे आवाहन आपल्या प्रसिद्धिपत्रकात केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT