ताडदेव आग प्रकरण Sakal
मुंबई

ताडदेव आग प्रकरण; डीएनएद्वारे पटणार मृतदेहाची ओळख

मृतदेहाचा डीएनए जुळण्यासाठी आज कंथारिया कुटुंबातील सदस्याचा डीएनए नमुना घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील ताडदेव परिसरातील सचिनम हाईट्स नावाच्या 20 मजली इमारतीला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू (Death) झाला. शनिवारी 6 पैकी 5 मृतदेहांची ओळख पटली मात्र एका मृतदेहाची (Death Body) ओळख पटणे बाकी आहे. त्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. मृतदेहाचा डीएनए जुळण्यासाठी आज कंथारिया कुटुंबातील सदस्याचा डीएनए नमुना घेण्यात येणार आहे. (Taddeo Fire Accident)

सचिनम हाइट्स येथे 19 व्या मजल्यावर राहणाऱ्या मंजुबेन कंथारिया यांचा धाकटा मुलगा किरीट कंथारिया हा अपघातानंतर बेपत्ता आहे. कुटुंबीयांना मंजुबेनचा मृतदेह सापडला, मात्र किरीटचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. मृत मंजुबेन यांचे जावई सुकेतू शहा यांनी सांगितले की, किरीट हा मंजुबेनसोबत 19 व्या मजल्यावर राहत होता. किरीटची मानसिक स्थिती ठीक नाही. गावदेवी पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सचिनम हाइट्सच्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी पाच जणांची ओळख पटली आहे. एक मृतदेह गंभीररित्या जळाला असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.

लोकांचे डीएनए नमुने ओळखण्यासाठी घेतले जात आहेत. सुकेतू शहा यांनी सांगितले की, किरीट बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी किरीटचा मोठा भाऊ योगेश याला डीएनएसाठी पोलिस ठाण्यात बोलावले आहे. किरीटचा शोध घेत इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज आणि शेजारील सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र किरीटचा शोध लागला नसल्याचे त्यांनी सांगितले.

नायर रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, अद्याप एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. शनिवारीच मृतदेहाचा डीएनए घेण्यात आला आहे. हा डीएनए बेपत्ता सदस्याच्या कुटुंबाशी जुळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT