Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar  
मुंबई

गुन्ह्याच्या गंभीरते नुसार कारवाई करा

पोलीस आयुक्तांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत दुचाकी चालकांना पोलीस आयुक्तांच्या नव्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्यास मुंबई पोलीस गुन्हा नोंद करत होते मात्र आता गुन्हा नोंदवला जाणार नाही. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे.जर अनवधानाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदवण्यात येऊ नये परंतु जर जाणून बुजून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या हेतूने गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते तर लायसन्स देखील रद्द करण्याची तरतूद ठेवली होती. परिणामी वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. अशा प्रकारे गुन्हा नोंद केल्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी, परदेशी जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यात अडचणी येऊ लागल्या. वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवायचे यामध्ये सर्वात जास्त दुचाकीस्वार असायचे. पोलीसंकडून आयपीसी प्रमाणे गुन्हा नोंदवल्यामुळे मोठा फटका बसत होता. या निर्णयामुळे दुचाकीस्वाराना दिलासा मिळणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले असले तरी वाहन चालकांनी कायद्याचे पालन केले पाहिजे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT