Uddhav Thackeray Sakal
मुंबई

मुंबई: अनधिकृत बांधकामाबाबत मुख्यमंत्र्यांचा BMC ला महत्त्वाचा आदेश

'कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत'

सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: "अनधिकृत बांधकामांवर (illegal construction) मुंबई पालिकेने (Bmc) युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत" अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. "पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज (debrig) टाकलं जात आहे" असे निदर्शनास आले आहे. याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करा.

"कोविडमध्ये आपण खूप चांगली कामगिरी केली आहे. आता रस्ते, पदपथ, स्वच्छता, नागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रित करून कालबद्ध रीतीने ती कामे पूर्ण करा आणि मुंबई शहराचा देशात आदर्श निर्माण करा" अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार व निर्देशांनुसार तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आयोजित बैठकीस पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, राज्याच्या वैद्यकीय टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर संजय ओक, डॉ. अजीत देसाई हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधीत सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, संबंधीत खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता व संबंधीत तज्ज्ञ डॉक्टर देखील या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, "मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्य-कठोरपणे यावर तातडीने कारवाई करावी. कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नये. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा, कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळायला नको" असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT