McDonald sakal
मुंबई

Mumbai News : मॅकडोनाल्डविरोधात कारवाई करा....; मुंबई पोलिसांना पत्र लिहून मागणी

अन्नामध्ये भेसळ करणे, ग्राहकांची फसवणूक करणे व विश्वासार्हतेचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पनीरऐवजी चीज वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर मुंबईतील मॅकडोनाल्ड विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ऑल फूड ॲण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने मुंबई पोलिस आयुक्तांना पत्रातून केली आहे. पोलिसा व्यतिरिक्त राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयालादेखील पत्र संस्थेने पाठविलं आहे.

अन्नामध्ये भेसळ करणे, ग्राहकांची फसवणूक करणे व विश्वासार्हतेचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे मॅकडोनाल्डविरोधात फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा. तसेच मॅकडोनाल्डच्या सर्व उपहारगृहांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष अभय पांडे यांनी पत्रात केली आहे. यापूर्वी 13 उपहारगृहांसह फास्टफूडची विक्री करणाऱ्या अन्य नामांकित 17 उपहारगृहांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठविली आहे.

मॅकडोनाल्ड ही जागतिक स्तरावरील फास्ट-फूड खाद्यपदार्थांच्या उपहारगृहाची साखळी असलेली प्रसिद्ध कंपनी आहे. जेथे लाखो ग्राहक दररोज मॅकडोनाल्डमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी गर्दी करतात. मॅकडोनाल्डमध्ये पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अलीकडेच उघडकीस आला आहे.

या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईसह राज्यातील मॅकडोनाल्डच्या उपहारगृहांची तपासणी केली. या तपासणीनंतर मुंबईतील 13 उपहारगृहांमध्ये सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, मॅकडोनाल्डमध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT