मुंबई

दिल्लीमध्ये मराठी साहित्यसंमेलन घ्या! सरहद संस्थेचे निमंत्रण

मिलिंद तांबे

मुंबई  : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याची मागणी सरहद संस्थेने केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना पत्र लिहिले आहे. आगामी संमेलन नाशिक या ठिकाणी न घेता दिल्लीत घेण्याची मागणी केल्याने पुन्हा एकदा वाद होण्याची शक्‍यता आहे. पानिपतच्या युद्धाला 260 वर्षे पूर्ण होत आहेत. हे युद्ध मराठी भाषेचा देशाच्या ऐक्‍यासाठी पुढाकार घेतल्याचे प्रतीक आहे. त्याचे स्मरण म्हणून महाराष्ट्र दिनी दिल्लीत संमेलन घेणे औचित्यपूर्ण ठरेल असे सहृदने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

लसीकरणाव्दारे एप्रिल पर्यंत कोरोनाचे संकट आटोक्‍यात येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हटले असून शनिवार 1 में 2021 या महाराष्ट्र दिवसापासून दिल्लीत 3 दिवसांचे संमेलन घेण्याची तयारी असल्याचे ही सरहद ने म्हटले आहे. 

यापूर्वी देखील घुमान, पंजाब मधील संमेलने एप्रिल महिन्यात झालेली आहेत. या काळात दिल्लीतील हवामान उष्ण नसल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तसेही दिल्लीत उन्हाळा 15 मे नंतर सुरु होतो. त्यामुळे या संमेलनात काही अडचण येणार नाही. 

यंदाचे संमेलन साधेपणाने पण मराठी भाषेच्या अभिजात दर्जासह सर्व मागण्यांचा आवाज देशाच्या राजधानीत उठविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते असे सरहद ने म्हटले आहे. संस्थेने दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजनाबाबतचे निमंत्रण माघारी घेतलेले नाही अथवा रद्द केलेले नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. संमेलन दिल्लीत घेण्याचे नियोजन झाल्यास संमेलन यशस्वी करण्याची 'सरहद' संस्थेची क्षमता असल्याचे ही सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी कळविले आहे. 

Take Marathi Sahitya Sammelan in Delhi Invitation of Border Organization

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT