मुंबई

भाजप खासदाराचा शरद पवारांना टोला; राममंदिराच्या भूमिकेवरुन रणकंदन सुरू...

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराचे भूमिपूजन केल्याने कोरोना संपणार नाही, या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानावर उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी पवार यांनी व राज्य सरकारमधील अन्य धुरीणांनी आपला इगो बाजूला ठेऊन मोदी यांची मदत घ्यावी, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. 

शरद पवारांच्या वरील विधानामुळे आपण आश्चर्यचकीत झालो आहोत. शरद पवार हे मोठे नेते आहेत, मात्र राममंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोनाही जाईल व 2024 च्या निवडणुकीत विरोधकांच्या जागाही कमी होतील, याची जाणीव पवारांनाही आहे, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. 

हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती वा कोणत्याही समाजाचे लोक असले तरी ते संकटात सापडले की देवाचाच धावा करतात, आपापल्या देवाची पूजा करतात. शरद पवार देवपूजा करतात की नाही हे आपल्याला ठाऊक नाही, पण जगातील कोणत्याही धर्माला मानणारे लोक संकटात देवाची आठवण काढतातच. अशा वेळी शरद पवार यांनी असे विधान करणे योग्य नाही. खरे पाहता पवारांच्याच इशाऱ्याने व मार्गदर्शनाने महाराष्ट्राचे सरकार चालले आहे, तरीही महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढतोच आहे. तुम्ही तीन पक्षांनी मिळून यावर गंभीरपणे कृती करावी. अरविंद केजरीवाल यांनी जशी पंतप्रधान मोदी व अमित शहा यांची मदत घेऊन दिल्लीत कोरोनावर नियंत्रण ठेवले तसे तुम्हीही सारे इगो बाजूला ठेवून मोदींना विनंती करा व महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव कसा कमी होईल, यासाठी प्रयत्न करा, असेही शेट्टी यांनी सांगितले आहे. 

तारीख सांगितली बरं का....
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संबंधित अग्रलेखाचाही शेट्टी यांनी यावेळी समाचार घेतला आहे. मंदिर वही बनाएंगे पर तारीख नही बताएंगे, अशी टीका शिवसेना केंद्रात सत्तेत असतानाही राऊत करीत असत. आता मोदीजींनी राममंदिराच्या भूमीपूजनाची तारीख सांगितली असल्याने आता राऊत तुम्ही अयोध्येत पाया पडायला कधी जाता, असेही शेट्टी यांनी विचारले आहे. त्यामुळे राज्यातील लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल व राज्यातील कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होईल, अशी उपरोधिक टीकाही शेट्टी यांनी केली आहे.

---------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय? आज सायंकाळपर्यंत येणार डीजीसीएचा रिपोर्ट

Ramadan Inspiring Child Story : बाप रे! इतक्या लहान वयात कडक उपवास? फातिमाच्या 'त्या' निर्णयाने जळगावकर थक्क; पाहा नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी बंद

दिग्गज अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा ठरला फ्लॉप, आता OTT वर ट्रेंडिंगमध्ये, चित्रपट पाहून डोळ्यात येईल पाणी

Nano Banana 2 झाले लाँच! फ्रीमध्ये तुमच्या फोटोला द्या नवा ट्रेंडी लुक, गुगल जेमिनीवर कॉपी-पेस्ट करा 'हे' 5 बेस्ट प्रॉम्प्ट

SCROLL FOR NEXT