मुंबई

"सासू सासऱ्यांकडून टीका टोमणे ऐकणे हा वैवाहिक जीवनाचा भाग आहे" : मुंबई हायकोर्ट

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 2 : सासू सासऱ्यांकडून टीका टोमणे ऐकणे हा वैवाहिक जीवनाचा भाग आहे, त्या कारणासाठी सासू सासऱ्यांना अटक करायची आवश्यकता नाही, असे मुंबई सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. या प्रकरणातील सासू सासऱ्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीनही मंजूर केला आहे.

भादंवि 498 अ नुसार कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत सुनेने सासू - सासऱ्यांनाविरोधात तक्रार केली आहे.सासूचे वय 75 असून सासऱ्यांनाचे वय 80 आहे. या फिर्यादीमुळे अटक होऊ शकते या शक्यतेमुळे दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला.

वैवाहिक जीवनात सासू सासऱ्यांकडून हास्यविनोद आणि टीका टोमणे होतच असतात. हे सरसकट प्रत्येक कुटुंबात होत असते. त्यासाठी दोन्ही वयोवृद्ध अर्जदारांंची पोलिस कोठडीची आवश्यकता नाही, असे निरीक्षण विशेष न्या. माधुरी बरालिया यांनी नोंदविले आहे. या प्रकरणात लावलेल्या अन्य आरोपांसाठी अटकेची गरज नाही, असे ही न्यायालयाने म्हटले आहे.

सुनेने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच त्यांची बँक खातीही सील केली आहेत. त्यामुळे जामीन मंजूर करु नये, असा युक्तिवाद सुनेकडून करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला आणि जामीन मंजूर केला.

taunting by mother in law is part and parcel of daily life mumbai high court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT