Subhedar Morya 
मुंबई

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

सीएनजीसाठी रांग असताना त्यांनी टॅक्सी बाहेर उभे राहून पेट्रोल पंपाच्या शेड जवळ उभे राहिले. त्या दरम्यान अचानक पेट्रोल पंपावर जाहिरातीची कमान कोसळली.

निलेश मोरे

मुंबई- पूर्व द्रुतगती मार्गावरील पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळून गाड्यासह शेकडो लोक दबले गेल्याने यात 14 जणांवर मृत्यूने घाला घातला. 80 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांमध्ये कुणाच्या डोक्याला , पायाला तर कुणाच्या मानेला जबर मार लागला आहे. या दुर्घटनेत दिवा येथे राहणारे सुभेदार मौर्य यांना गंभीर जखम झाली आहे. सुभेदार मौर्य हे 62 वर्षाचे असून ते दिवा येथील सदगुरु नगर येथे राहतात. ते टॅक्सीचालक असून मुलुंड येथे त्यांचा टॅक्सी स्टँड आहे. मुलुंड ते घाटकोपर परिसरात ते टॅक्सी भाडे घेत असतात.

सुभेदार मौर्य हे सी एन जी भरण्यासाठी चेंबूर तर कधी घाटकोपर पूर्वेतील पेट्रोल पंपावर जात असतात. सोमवारी ते दुपारच्या वेळेस सीएनजी भरण्यासाठी गेले होते. सीएनजीसाठी रांग असताना त्यांनी टॅक्सी बाहेर उभे राहून पेट्रोल पंपाच्या शेड जवळ उभे राहिले. त्या दरम्यान अचानक पेट्रोल पंपावर जाहिरातीची कमान कोसळली. यावेळी तिथे उभे असलेल्या सर्वांच्या तोडून एकच किंकाल्याचा आवाज आल्याचे सुभेदार म्हणाले.

सुभेदार मौर्य यांनी देखील तिथून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. या दरम्यान वरून कोसळलेल्या लोखंडाच्या कमानीचा भाग त्यांचे डोके ते पाठीमागच्या भागावर घासून गेल्याने ते खाली पडले. लोखंड घासल्याने पाठीवर व मानेवर मोठा मार लागल्याचे सुभेदार मौर्य यांचे लहान बंधू जितेंद्र मौर्य यांनी माहिती देताना सांगितले.

एकमेव उदरनिर्वाहचे साधन असलेल्या टॅक्सीचा चुराडा

पेट्रोल पंपावर होर्डिंगची कमान कोसळल्याने त्याच्या खाली अनेक गाड्या दबल्या जाऊन काही गाड्यांचा जागीच चुराडा झाला. यात सुदैवाने सुभेदार हे टॅक्सीच्या बाहेर उभे असल्याने वाचले. सुभेदार हे टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुलं आहेत. दोन मुलांची लग्न झाली असून एक मुलगा गतिमंद आहे. घरची आर्थिक स्थिती ठीक नसते. त्यात सुभेदार मौर्य हे टॅक्सी भाडे मारून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढतात.

संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक भार सुभेदार यांच्यावर असल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन असलेल्या टॅक्सीचा चुराडा झाल्याने आता पुढे काय करायचे अशी चिंता त्यांना लागली आहे. जीव वाचला आहे पण कुटुंबाचा भार पुढे न्यायचा आहे, या एकाच चिंतेत सुभेदार असल्याचे त्याचे बंधू जितेंद्र मौर्य यांनी माहिती देताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT