मुंबई

नापास करण्याची धमकी देऊन; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार 

संतोष सुतार


माणगाव (वार्ताहर): परीक्षेत नापास करेन आणि आईची नोकरी घालवेन, अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. दरम्यान, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे. 

माणगाव तालुक्‍यातील एका जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत असून तिची आईही शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवर 2016 पासून अत्याचार करीत होता. पीडित मुलीला तुला नापास करेन आणि तुझ्या आईची नोकरी घालावेन, अशी धमकी देऊन हा नराधम शिक्षक तिच्यावर शरिरिक अत्याचार करीत होता. 

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल 
अखेर पीडित मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. माणगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. माणगाव पोलिसांनी मदन वानखेडे याला अटक केली असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या नावाने इंस्टाग्रामचे फेक अकाऊंट काढून मित्र मैत्रिणींमध्ये बदनामीचे मेसेज पाठवल्याचाही आरोप मदन वानखेडेवर ठेवण्यात आला आहे. 

Teacher abuses student in mangaon in raigad

-----------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT