मुंबई

वर्गात अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी शिक्षिकेला अटक

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्‍टर-४ मधील एका कॉन्व्हेंट शाळेतील सहावीतल्या विद्यार्थ्यासोबत वर्गामध्ये अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेला व एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. या शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्यासोबत अश्‍लील चाळे केल्याचे तपासात उघड झाल्याने तिला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.   

कोपरखैरणे सेक्‍टर-४ मधील कॉन्व्हेंट शाळेत सहावीतील ११ वर्षीय पीडित विद्यार्थ्यासोबत वर्गामधील इतर दोघांनी अश्‍लील चाळे केले होते. तसेच सदर प्रकाराची माहिती कुणाला देऊ नये, म्हणून त्याला मारहाण केली. या प्रकारानंतर पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. 

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोपरखैरणे पोलिसांनी दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार करणे, मारहाण करणे, धमकावणे या कलमांसह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान, शाळेतील महिला शिक्षिकेनेही पीडित विद्यार्थ्यासोबत अश्‍लील चाळे करून त्याला मारहाण केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सकाळी या शाळेतील महिला शिक्षिकेला व दोघांपैकी एका विद्यार्थ्याला अटक केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास या महिला शिक्षिकेला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने शिक्षिकेला ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याची, तर अल्पवयीन मुलाला भिवंडी येथील बालन्यायालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT