Schoolgirl sexually abused Action definitely taken holding school responsible Education Commissioner pune  Sakal
मुंबई

Mumbai Crime News : उर्दू शिकवायला आला अन् कोणी नाही बघून बहिण भावावर केला लैंगिक अत्याचार

हा शिक्षक शिकवणीसाठी या दोघांच्या घरी जात होता.

सकाळ डिजिटल टीम

अरबी व उर्दु भाषा शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. ही दोन्ही मुलं भावंडं आहेत. घडला प्रकार कळताच त्यांच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जोगेश्वरी पूर्व भागामध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, तसंच २५ वर्षीय शिक्षकाला अटकही करण्यात आली आहे.

सहा वर्षांची मुलगी व मुलगा यांना उर्दू व अरबी भाषेचे धडे देण्यासाठी आरोपी मौलाना या मुलांच्या घरी येत होता. त्यावेळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने या मुलांवर लैंगिक अत्याचार केले. घडलेला प्रकार आईला कळताच तिने या शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

४ डिसेंबर २०२२ पासून हा आरोपी मुलांना अरबी आणि उर्दू भाषा शिकवण्यासाठी त्यांच्या घरी येत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला राहत्या परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

SCROLL FOR NEXT