teachers Strike Sakal media
मुंबई

शिक्षक दिनीच शिक्षकांचे मुंबई उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण

संजीव भागवत

मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी (teachers problem) असंख्य वेळा निवेदने देऊनही त्यावर अंमलबजावणी करण्यास शालेय शिक्षण विभागाकडून (School education Authorities) दिरंगाई केली जात असल्याने याविरोधात शिक्षक परिषदेने (teachers union) मुंबईतील (Mumbai) शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक दिनी (teachers day) ५ सप्टेंबर रोजी उपोषण (strike) करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सुरू होणार असतानाही शिक्षक आणि मुंबई, ठाणेसह कोकणातील शिक्षकेतराच्या वेतनावर कोणताच निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे हे वेतन ५ सप्टेंबरपूर्वी करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. मुंबईतील काही शाळांचे जुलै २०२१ चे वेतन अजूनही झालेले नाही. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून त्यामुळे आम्ही ५ सप्टेंबर रोजी शिक्षण संचालक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या वेतनासाठीचा निधी हा मंत्रालयातून निधी मंजूर झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुंबई विभागासाठी पुरेसा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते प्रयत्न न केल्याने मुंबई विभागातील शिक्षकांचे वेतन रखडले जात असून त्यामुळे असंख्य शिक्षकांना यामुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे, यासाठी वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षण विभागातील अधिकारी ऐकत नसल्यानेच आम्हाला शिक्षक दिनी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT