मुंबई

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन द्या 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले नव्याने सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने काढले आहेत; मात्र शाळा बंद असल्याने आता लिपिकांना शाळेत जाऊन नव्याने बिले काढणे शक्‍य नाही. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाने मार्च महिन्याचे वेतन पूर्ण काढावे आणि एप्रिल, मे महिन्याच्या वेतनात कपात करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांचे वेतन विलंबाने होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने मार्चच्या वेतनाची बिले लवकर मागवून घेतली होती. ही बिले मार्चच्या 15 मार्चपूर्वीच ऑनलाईन जमा करून घेतली होती. कोषागारात वेतनासाठी आवश्‍यक रकमेची तरतूद नियोजित असल्यामुळे मार्चचे वेतन करणे सहज शक्‍य होते, पण शिक्षण विभागाच्या नव्या परिपत्रकानुसार वेतनामध्ये कपात करून बिले पाठवणे हे लिपिकांना शक्‍य नाही किंवा ही प्रक्रिया राबवल्यास वेतन मिळण्यास विलंब होऊ शकतो.

 नवीन परिपत्रकानुसार मार्चचे वेतन 10 एप्रिलपर्यंत होणे अशक्‍य आहे. याचा फटका शिक्षकांना बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिक्षकांचे मार्चच्या वेतनात कपात करण्याऐवजी एप्रिल किंवा मे महिन्याच्या वेतनात कपात करण्यात यावी, अशी मागणी "टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट' या शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. 
.... 

निर्णयाचा पुनर्विचार करावा 
शासन निर्णयानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्‍य असले तरी लिपिक आणि मुख्याध्यापक मुंबईबाहेर वसई, विरार, कल्याण, बदलापूर अशा उपनगरांत राहतात. पगार बिलासाठी आवश्‍यक सॉफ्टवेअर घरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे 75 टक्के कपात केलेली बिले 10 ते 11 तारखेपर्यंत ऑनलाईन जमा झाली. कागदपत्रे शिक्षण खाते आणि बॅंकेला देणे शक्‍य होणार नाही. शिक्षकांच्या वेतनाबाबत सरकारने घातलेल्या घोळामुळे मार्चचे वेतन विलंबाने होणार आहे. वेतनकपातीचा निर्णय एप्रिलच्या वेतनासाठी राबवता आला असता, असे सांगत आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

IND vs PAK, Asian Games : मोहसिन नक्वीला 'अपमान' डोळ्यासमोर दिसला, भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीच पळ काढला; नेमकं काय केलं?

LPG-PNG Gas Connection: सिलिंडर संपण्याची चिंता मिटणार! आता घरातच मिळणार गॅस; सरकारची मोठी मोहीम, घरबसल्या असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : दिवेआगर समुद्र दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज

Crime News : हिमाचलमध्ये हत्या करून फरार .चौघे बिहारी अटकेत; जळगावात मोबाईल विकायला उतरताच पडल्या बेड्या

SCROLL FOR NEXT