देवपाडा शाळा 
मुंबई

शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नेरळ (बातमीदार) : कर्जत तालुक्‍यातील देवपाडा शाळेत अनेक वर्षांपासून शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तीन वर्षांपासून येथील शिक्षकांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अद्याप शिक्षकच आले नाहीत. अनेक वेळा शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रारही केल्या; मात्र अद्याप शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे देवपाडा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला दिला आहे. 

देवपाडा शाळेत पहिली ते आठवीपर्यंत सुमारे 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत मुख्याध्यापक व चार सहशिक्षक आहेत; परंतु ही आठवीपर्यंतची शाळा असल्याने शिक्षकांची कमतरता भासत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. देवपाडा या ग्रामीण भागात असलेल्या शाळेत देवपाडा व आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतात. परंतु, सरकारने या शाळेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. 

तीन वर्षांपासून येथील शिक्षकांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर दुसरे शिक्षक येणे अपेक्षित होते; मात्र अद्याप शिक्षकच आले नाहीत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात अनेकदा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रारही केल्या होत्या. तरीही विभागाचे शाळेकडे दुर्लक्ष आहे. शाळा व्यवस्थापन समितीने पुन्हा एकदा शिक्षकांची नेमणूक करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडे 10 दिवसांपूर्वी पत्र दिले. या पत्रात देवपाडा शाळेवर सात दिवसांत शिक्षकाची नेमणूक करावी; अन्यथा आम्ही ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती शाळेला टाळे ठोकू. जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवू, असा इशारा पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिणारे यांनी शिक्षण विभागाला दिला आहे. 

देवपाडा शाळेत अनेक वर्षांपासून शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांची नेमणूक करण्यासंदर्भात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे; परंतु अद्याप शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा पत्र दिले आहे. सात दिवसांत शिक्षकाची नियुक्ती केली नाही, तर शाळेला टाळे ठोकू. 
- लक्ष्मण शिणारे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, देवपाडा 

सर्व शिक्षा अभियानातंर्गत कर्जत तालुक्‍यातील 150 शिक्षकांचे प्रशिक्षण कर्जत-किरवली येथे सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता भासत आहे; परंतु महिनाभरात देवपाडा शाळेला शिक्षक दिला जाईल. तसे पत्रही काढण्यात आले आहे. 
- सी. एस. रजपूत, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT