मुंबई

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला परवानगी; स्थानकांवर प्रवेशासाठी वैध ओळखपत्र अनिवार्य

प्रशांत कांबळे

मुंबई : राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर रेल्वे मंत्रालयाने शालेय शिक्षकांना आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मुंबई उपनगरी नेटवर्कवर उपनगरी सेवांमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. स्थानकांवर प्रवेश करण्यासाठी वैध ओळखपत्रे अनिवार्य राहणार आहे.

राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिलेल्या श्रेणी वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती रेल्वेने केली आहे. प्रवाशांनी कोविड-19 साठी असलेल्या आदेशानुसार वैद्यकीय आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनाने केले आहे.

----------------------------------------------------

मुंबई पोलिसांचं पुढचं पाऊल, पेट्रोलिंग आता डिजिटल स्वरुपात

मुंबईत 26/11 ला झालेल्या दहशवादी हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत असताना आता मुंबई पोलिस महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेबाबत डिजिटल झाली आहे. ही बारकोड पेट्रोलिंग सुविधा दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून तिच्या यशावर लवकरच ती संपूर्ण शहरात लागू करण्यात येईल.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, सीएसएमटी स्थानक यासारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इमारत परिसरात क्यूआर कोड यंत्रणा बसवण्यात आली असून त्या अंतर्गत निर्धारीत करण्यात आलेल्या गस्तीचा लेखाजोखा या यंत्रणेद्वारे सहज मापता येणार आहे. मुंबई हल्ल्यांला 12 वर्ष पूर्ण होत असताना त्यापूर्वीच महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिस डिजिटल झाले आहेत.

-------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT