Technical failure in Indigo airservice plane passengers runway protest mumbai esakal
मुंबई

Indigo Airline Technical Failure : इंडिगो कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड!

चक्क विमान प्रवाशांचे रनवेवर बसून आंदोलन !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विमानततळावरून नैनितालला जाणाऱ्या इंडिगो विमानांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इंडिगोचे विमान रनवेवरच दोन तास खोळंबून राहिले होते. त्यामुळे दीड ते दोन विमानातच बसून बसून होते. अखेर प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी विमानाबाहेर पडून रनवेवर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मुंबई विमानतळावर मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे विमान मंगळवारी सकाळी ८ वाजता मुंबईहून नैनितालकरिता उड्डाण करणार होते. परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान दीड ते दोन तास धावपट्टीवरच थांबले. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांचाही खोळंबा झाला. अखेर प्रवाशांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी विमानाबाहेर पडून पर्यायी विमानाची व्यवस्था कंपनीने करावी या मागणीसाठी रन वेवरच ठिय्या मांडला.

त्यामुळे काही काळासाठी मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, म्हणून सीआयएसएफच्या जवानांना रन वे वर पाचारण करण्यात आले. रनवेवर बसलेल्या प्रवाशांना बसमध्ये बसवून पुन्हा विमानतळावर आणण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT