मुंबई : मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेसमधून (tejas express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना (commuters) आगामी सणासुदीच्या काळात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) लिमिटेडकडून आकर्षक प्रवास ऑफरची (travelling offer scheme) योजना आखली आहे. त्यानुसार प्रवाशांना भेटवस्तू (gifts) मिळणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने गाडी क्रमांक 82902 / 82901 अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस चालविण्यात येते. या तेजस एक्सप्रेसमध्ये सणासुदीच्या फायद्यांसह प्रवाशांचे वाढदिवस, विशेष सण साजरे केले जातात. तर, पूर्वी कॅशबॅक ऑफर दिली होती आणि आता लकी ड्रॉ द्वारे सरप्राईज गिफ्टची दिले जाणार आहे. तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यानच्या प्रवासासाठी लकी ड्रॉद्वारे भेटवस्तू देण्यात येईल.
दोन्ही श्रेणीतील प्रवासी, एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार आणि एसी चेअर कारमधून प्रवास करताना लकी ड्रॉमध्ये काढलेल्या पीएनआर क्रमांकावर एक सरप्राईज गिफ्ट दिले जाणार आहे. नुकताच रक्षाबंधनाच्या सणाच्यानिमित्ताने महिला प्रवाशांना 5 टक्के विशेष कॅशबॅक ऑफर दिली होती, अशी माहिती इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी दिली.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने खबरदारी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी ट्रेन क्रमांक 82902 / 82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता सर्व आरोग्य आणि कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून कंपनीने 7 ऑगस्ट 2021 पासून तेजस एक्सप्रेस ट्रेनचे ऑपरेशन पुन्हा सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.