Dahisar Lake sakal media
मुंबई

दहिसर: नववर्षात पालिका तरण तलावाची भेट; तेजस्वी घोसाळकर यांची यशस्वी धडपड

कृष्ण जोशी

मुंबई : प्रभाग क्रमांक एकच्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (tejaswi Ghosalkar) यांच्या प्रयत्नांनी दहिसरमध्ये (Dahisar) महापालिकेचा सुसज्ज जलतरण तलाव (municipal lake) तयार होत असून नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात त्याच्या लोकार्पणाचा प्रयत्न सुरु आहे. हा तलाव ऑलिंपिक (Olympic) साईझचा नसला तरी तो 30 मीटर गुणिले 25 मीटर असा असल्याने हौशी व शिकाऊ जलतरणपटूंसाठी (Swimmer) पुरेसा आहे. यात जलतरणपटूंना लागणाऱ्या सर्व सोयी असतील. तलावाच्या आवारात त्याचे प्रशासकीय कार्यालय, स्नानगृहे, चेंजिंग रूम असतील. त्याचप्रमाणे पहिल्या माळ्यावर सुसज्ज व्यायामशाळाही (GYM) उभारली जाईल, असे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांनी सांगितले.

विशेष म्हणजे महापालिकेने प्रथमच नव्या विकास आराखड्यात या तरणतलावासाठी आरक्षण ठेवले होते. त्यानंतर लगेच तलावाचे बांधकाम सुरु करण्यात आले, दरम्यानच्या काळात कोविडमुळे त्यात खंड पडला. मात्र आता पुन्हा हे काम सुरु झाले असून लौकरच ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कांदरपाडा अग्निशामन केंदद्राशेजारी महापालिकेच्या भूखंडावर पालिकेतर्फेच हा तरणतलाव बांधला जात आहे. सत्तर हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर साडेसात कोटी रुपये खर्चून हा तलाव बांधला जाईल. यातील पाणी शुद्ध करण्यासाठी नवे ओझोन तंत्र वापरण्यात येणार असून त्यामुळे जलतरणपटूंची त्वचा काळी पडत नाही. या परिसरात सुसज्ज तरणतलाव सुरु करण्याची दहिसर-बोरीवलीकरांची फार जुनी मागणी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

SCROLL FOR NEXT