लोकार्पण केलेली तेजस्विनी बस. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे) 
मुंबई

ठाण्यात महिलांच्या दिमतीला ‘तेजस्विनी’

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेने शहरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावला. तब्बल १२ विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणाचे कार्यक्रम पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले.    

ठाण्यात परिवहन सेवेच्या प्रवासात महिला प्रवाशांचा मोठा सहभाग आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात महिलांसाठी ‘तेजस्विनी’ बस चालविल्या जात आहेत. त्यातच आता ठाणे महापालिका क्षेत्रातही महिलांसाठी ५० तेजस्विनी बसेस चालविण्यात येणार असून या तेजस्विनी बसेसचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या तेजस्विनी बससाठी लागणाऱ्या निधीमधील ५० टक्के खर्च पालिका करणार असून या ‘महिला विशेष’ बसमध्ये वाहकही महिला असणार आहेत. 

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना एकूण ३०० तेजस्विनी बसेस मिळणार आहेत. त्यापैकी ५० बसेस ठाणे शहराच्या वाट्याला आल्या आहेत. तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर टीएमटीच्या ताफ्यात या तेजस्विनी बस दाखल झाल्या असून यामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बसच्या खरेदीपासून ते संचालनापर्यंतचा खर्च एकूण १४ कोटींचा असून यापूर्वी सरकारकडून ६ कोटींचे अनुदान पालिकेला प्राप्त झाले आहे. 

..अशी आहे तेजस्विनी
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या बसची रचना करण्यात आली आहे. या बसमध्ये चालक जरी पुरुष असले तरी वाहक महिला असणार आहेत. तसेच बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली तसेच पॅनिक बटन देखील असणार आहे. या बस सकाळी व संध्याकाळी विशेषतः गर्दीच्या मार्गावर धावणार असून या प्रकल्पाच्या सर्व निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या आहेत. या बससाठी १५० महिला वाहकांच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: लिंबू टिंबू समजणाऱ्या आयर्लंडने इंगा दाखवला; भारतीय गोलंदाजांना झोडले... अय्यरच्या टीमसमोर तगडे लक्ष्य ठेवले

MPSC Prelims Reform: एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी २०२७ पासून नवी पद्धत लागू

Pune University QS ranking drop: राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे विद्यापीठाच्या क्यूएस मानांकनात मोठी घसरण; युवक काँग्रेसचा सरकारवर आरोप

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

SCROLL FOR NEXT