file photo
file photo 
मुंबई

महामुंबईतून पाऊस परतीच्या प्रवासाला 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महामुंबईतून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. पुढील तीन दिवस पावसाची शक्‍यता नसून, तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे.

मुंबईसह महामुंबईतून सोमवारपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. दरवर्षी 1 ऑक्‍टोबरच्या सुमारास मुंबईतून पाऊस परतीच्या प्रवासाला निघतो; त्यासाठी यंदा 13 दिवस उशीर झाला आहे. परंतु, महामुंबईत पुढील काही दिवस पावसाची शक्‍यता नाही. 
सोमवारी डहाणू येथे 34.9 आणि 25.2 अंश, अलिबाग येथे 34.3 आणि 25.5 अंश, ठाण्यात 35 आणि 25.6 अंश अनुक्रमे कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहील.

पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यता नसून, त्यानंतर तुरळक सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

........ 

तापमानात होणार वाढ 
सोमवारी सांताक्रूझ येथे 35.9 अंश कमाल आणि 25.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील 48 तासांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT