मुंबई

दहा टन प्लास्टिक कचरा!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कांदिवलीतील क्रांतिनगर परिसरात पोयसर नदीतून आजपर्यंत एकूण १० टन प्लास्टिक कचरा रिव्हर मार्च संघटनेने बाहेर काढला. शनिवारी चार टन प्लास्टिक बाहेर काढण्यात आले होते. वाढत्या कचऱ्यामुळे सरकारचे प्लास्टिकबंदीचे धोरण अयशस्वी ठरल्याची टीकाही रिव्हर मार्च संघटनेने केली.  

रविवारी आंतरराष्ट्रीय नदी दिन आणि मंगळवारी गांधी जयंतीनिमित्ताने रिव्हर मार्च संघटनेने शनिवारपासून नदी स्वच्छता मोहीम पुन्हा सुरू केली. जानेवारीपर्यंत प्रत्येक शनिवार-रविवार १०० तास स्वच्छता मोहीम सुरू राहणार असल्याचे रिव्हर मार्च संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.  

पावसाळ्यापूर्वी तब्बल २८ रविवार पोयसर नदी स्वच्छता मोहीम रिव्हर मार्चने राबविली. त्या वेळी तब्बल सव्वादोन लाख किलो प्लास्टिकचा कचरा नदीपात्रातून गोळा करण्यात आला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनअधिकारी, स्थानिक रहिवासी, पालिका विभाग अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जीएस स्कूल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी मोहिमेत सहभागी झाले होते.नदीत मिसळले जाणारे सांडपाणी, पात्रातच शौचाला बसणारे नागरिक आणि थेट प्रसाधनगृहातून नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या मलमूत्रामुळे नदीचे पात्र खूपच खराब झाल्याबाबत रिव्हर मार्चचे प्रमुख सदस्य गोपाल झवेरी यांनी नाराजी व्यक्त केली. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने काही स्वयंसेवकांची तब्येतही स्वच्छता मोहिमेदरम्यान बिघडली. पालिकेकडून मिळालेल्या एका जेसीबी मशीनच्या साह्यानेच प्लास्टिकचा कचरा उचलण्यात आला. सायंकाळी रिव्हर मार्चचे सदस्य नदीपात्रातील स्थानिकांसाठी जनजागृतीचे काम करत असल्याचेही झवेरी म्हणाले. 

स्थानिकांकडून कार्यकर्त्यांना शिवीगाळ  
स्वच्छता मोहिमेत सहभागी महिला व लहान मुलांना स्थानिक गर्दुल्ले आणि मद्यपींकडून शिवीगाळ होत असल्याची तक्रार रिव्हर मार्चचे प्रमुख सदस्य गोपाल झवेरी यांनी दिली. रात्री जनजागृती करणाऱ्या स्वयंसेवकांना जास्त त्रास होत असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT